Nanded Hospital Tragedy : 'नांदेडच्या रुग्णालयात भ्रष्टाचाराचे बळी'

Nanded Hospital Tragedy : नांदेड, संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयांत रुग्ण दगावले गेले, या घटनेने संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
Nanded Hospital Tragedy :
Nanded Hospital Tragedy :Sarkarnaa
Published on: 
Updated on: 

Nanded Hospital Tragedy : नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील बळी हे औषधांचे नसून भ्रष्टाचाराचे बळी आहेत. टास्क फोर्स नेमले गेले, पण ते काय करतात, औषधे रुग्णालयात पोहोचली नाहीत तिथे दलाल बसलेत का, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली.

नांदेड, संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयांत रुग्ण दगावल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. औषधांच्या तुटवड्यामुळे हे रुग्ण दगावल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला, तर राज्य सरकारने डीनवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. यामुळे सत्ताधारी विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीकेचा आसूड ओढला.

Nanded Hospital Tragedy :
Nanded Death cases : भारती पवार, दादा भुसे पोहोचले थेट जिल्हा रुग्णालयात!

कोरोना काळात ज्या डॉक्टरांनी स्वत:चे जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचवले. त्यांच्यावर उपचार केले, पण आज त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत. जोपर्यंत महाविकास आघाडी सरकार होते तोपर्यंत सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांच्या साठ्याची अपटेड ठेवली जात होती. ती आजही सुरू आहे का, हेही तपासले पाहिजे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदासाठी मारामाऱ्या, चढाओढ सुरू आहे. यांच्याकडे गोवा, गुवाहाटीत मजा मारायला पैसे आहेत. परदेश वाऱ्यासाठी पैसे आहेत. जाहिराती देण्यासाठी पैसे आहेत, पण रुग्णांच्या औषधांसाठी पैसे नाहीत, याची सीबीआय चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. तसेच नांदेडमधील डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का केला, असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

Nanded Hospital Tragedy :
NCP Hearing : राष्ट्रवादीत हालचाली वाढल्या; निवडणूक आयोगाच्या सुनावणीला शरद पवार उपस्थित राहणार

मंत्री म्हणत आहेत, औषधे मुबलक आहेत. पण वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांमध्ये रुग्णालयांमध्ये औषधांचा खडखडाट असल्याचे दिसते आहे. हे नेमके मंत्री कोण आहेत. रुग्णालयातील मृत्यू हे भ्रष्टाचाराचे बळी आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणाच पोखरणारे खेकडे या सरकारमध्ये बसलेत. त्यामुळे या सरकारची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी ठाकरेंनी केली. (Nanded News)

नांदेडच्या डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केला गेला. कळवा, नागपूर, संभाजीनगरच्या रुग्णालयांमध्येही बळी गेले. पण एका मस्तवाल आमदाराने रुग्णालयाच्या डीनला स्वच्छतागृह साफ करायला लावले. राज्यात इतक्या घटना घडल्या, पण मुख्यमंत्र्यांनी काय केलं. आरोग्य खात्यातील नियुक्त्यांसाठी रेटकार्ड ठरवले, अशी माहिती असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.