Nanded Loksabha Constituency : अशोक चव्हाणांचा लोकसभा लढवण्याचा मूड नाही ; मीनल खतगांवकरांकडून तयारी सुरू..

Ashok Chavan News : माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या मीनल यांचा जनसंपर्क चांगला असून तो वाढवण्यावर सध्या त्या भर देत आहेत.
Nanded Loksabha News
Nanded Loksabha NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Congress News : आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा मजबूत गड म्हणून ओळखला जायचा. 2014 च्या मोदी लाटेत अशोक चव्हाणांनी इथे भाजपला धूळ चारली होती. (Nanded Loksabha Constituency) 2019 मध्ये पराभव झाल्यानंतर मात्र अशोक चव्हाणांची आता पुन्हा लोकसभा लढवण्याची इच्छा नाही. काँग्रेस पक्षश्रेष्ठींना नकार देणे कठीण आहे, तसेच पर्यायही द्यावा लागेल हे माहीत असल्याने अशोक चव्हाणांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे.

Nanded Loksabha News
Congress : काँग्रेस करणार लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा ...

स्वतः विधानसभा लढवण्यास इच्छूक असल्यामुळे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी डाॅ. मीनल खतगांवकर यांच्या नावाला हवा देण्यास सुरूवात केल्याचे बोलले जाते. जिल्ह्यातील प्रत्येक काँग्रेसचा पदाधिकारी, कार्यकर्ता हा नांदेड लोकसभेच्या पुढच्या उमदेवार मीनल खतगावकर असतील असे सांगत आहे. (Congress) मीनल खतगावर या माजी खासदार तथा मंत्री भास्कर खतगावकर यांच्या सूनबाई आहेत.

माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या मीनल यांचा जनसंपर्क चांगला असून लोकसभेच्या दृष्टीने तो वाढवण्यावर सध्या त्या भर देत आहेत. (Nanded) नुकत्याच झालेल्या तेलंगणा राज्यातील काँग्रेसच्या विजयात अशोक चव्हाणांचा मोठा वाटा होता. त्यांच्यावर 15 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पैकी सहा ठिकाणी काँग्रेसला यश आले आहे. विशेष म्हणजे याआधी या मतदारसंघात काँग्रेसला कधीही विजय मिळालेला नव्हता. अशोक चव्हाण यांनी या मतदारसंघात स्वतःला झोकून दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभा निवडणूक राज्यात महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवणार आहे. राज्यातील सरकारविरोधी वातावरण आणि भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीत नांदेडची जागा काँग्रेसच्या वाट्याला असल्यामुळे तीन पक्षाच्या ताकदीवर मीनल खतगावकर सहज विजयी होतील, असा अंदाज लावला जात आहे. त्यामुळे चव्हाण यांनी विधानसभा लढवण्याला प्राधान्य दिल्याचे बोलले जाते.

जेणेकरून जिल्ह्याचा खासदारही काँग्रेसचा असेल आणि विधानसभेच्याही सर्वाधिक जागा जिंकता येतील असा चव्हाण यांचा प्रयत्न असणार आहे. नांदेड जिल्ह्यातील राजकारणात माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांचे मोठे वर्चस्व राहिले आहे. आमदार, खासदार, मंत्री, सहकारी संस्थांचे अध्यक्ष आदी पदे त्यांनी सांभाळली आहेत. सध्या ते नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत.

Nanded Loksabha News
Ashok Chavan : ''नुकसान झाल्यानंतर 15 दिवसांनी केंद्रीय पथक येणार असेल, तर...'' ; अशोक चव्हाणांचं विधान!

याशिवाय देगलुर, बिलोली, मुखेड या भागात मोठा जनसंपर्क आहे. याचा फायदा मीनल पाटील खतगावकर यांना होऊ शकतो. काँग्रेसच्या सभा, बैठका, मेळावे सार्वजनिक कार्यक्रमात मीनल पाटील खतगावकर आवर्जून हजेरी लावत आहेत. एवढेच नाही, तर पक्षाच्या जाहिरात, बॅनरवर त्यांचे छायाचित्र स्पष्टपणे झळकताना दिसून येत आहे. गेल्या निवडणुकीत भास्कर पाटील खतगावकर हे भारतीय जनता पक्षात होते.

याचा फायदा खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना झाल होता. तसेच मुखेड, नायगाव विधानसभा मतदारसंघातून चिखलीकरांना खूप मोठे मताधिक्य मिळाल्याने त्यांचा विजय सोपा झाला होता. आता खतगावकर यांची घरवापसी झाली असून चव्हाण-खतगावकर यांचे एकत्रित प्रयत्न आणि त्यांना राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे) गटाची होणारी मदत या जोरावर नांदेडची जागा काँग्रेस पुन्हा खेचून आणण्याच्या प्रयत्नात आहे.

Edited By : Jagdish Pansare

Nanded Loksabha News
Nanded BJP News : खासदार चिखलीकरांच्या बैठकीत आमदार राजेश पवार टार्गेट...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com