Congress-BJP News : नांदेड-वाघाळा महापालिकेत खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पहिल्यांदाच बाजी मारली. बहुमतासह सत्ता मिळाल्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. परंतु याच निवडणुकीत एक वेगळीच गोष्ट घडली ती म्हणजे नांदेड महापालिकेच्या विजयाचे शिल्पकार असलेल्या अशोक चव्हाण यांचे निवासस्थान असलेल्या प्रभागातच काँग्रेसने भाजपला धोबीपछाड दिली. सत्यपाल सावंत नावाच्या एका सामान्य टेम्पो चालक उमेदवाराने भाजपला येथे धूळ चारली.
आतापर्यंत नांदेड महापालिकेवर कायम काँग्रेस (Congress) वर्चस्व राहिले. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने येथे विरोधकांना कधीच तोंड वर काढू दिले नव्हते. गेल्या महापालिकेत 75 जागा जिंकत अशोक चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसने पाशवी बहुमत पटकावले होते. यंदाच्या निवडणुकीत भाजपचे नेतृत्व करताना अशोक चव्हाण यांनी बहुमतासह सत्ता राखली असली तरी नगरसेवकांची संख्या मात्र घटली आहे.
भाजपच्या विजयाचे कोडकौतुक नांदेडमध्ये होत असले अशोक चव्हाण यांच्या अंगणातच विजय मिळवणाऱ्या काँग्रेसच्या या सामान्य उमेदवाराची चर्चा अधिक होत आहे. गेल्या वीस वर्षापासून आपण काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करत आहे. अशोक चव्हाण यांच्या काळातही आपण त्यांच्यासोबत काम केले, पण कधी न्याय मिळाला नाही. आताही जेव्हा काँग्रेस पक्षाने मला शिवाजीनगर प्रभागातून उमेदवारी दिली तेव्हा आपल्या भाजपच्या दिग्गजांविरुद्ध विजय मिळेल, असे वाटले नव्हते.
भाजपच्या (BJP) उमेदवारामागे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार अमर राजूकर यांच्यासारख्यांचे पाठबळ होते. त्यामुळे मला मिळालेला हा विजय निष्ठावंत सर्व सामान्य काँग्रेस उमेदवाराचा आहे. मी भाजपच्या उमेदवाराचा नाही तर वरील दिग्गज नेत्यांचा पराभव केला आहे, अशी प्रतिक्रिया सत्यपाल सावंत यांनी दिली आहे.
सत्यपाल सावंत यांचा मुळ व्यवसाय हा टेम्पो चालवण्याचा आहे. खासदार रवींद्र चव्हाण यांनी त्यांना प्रभाग क्रमांक 8 मधून उमेदवारी दिली. साडेपाच हजार मते घेऊन त्यांनी उमेदवाराचा पराभव केला. याच प्रभागात भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे सत्यपाल सावंत यांच्या विजयाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी महापालिका निवडणुकीत आमचे आणखी उमेदवार निवडून आले असते. ज्या ज्या ठिकाणी मी बदल सुचवले, सूचना केल्या आणि अंमलबजावणी झाली तिथे निकाल आमच्या बाजूने लागले. पण जिथे दुर्लक्ष केले गेले तिथे पक्षाचे नुकसान झाल्याचे चव्हाण यांनी म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.