Bjp First Mumbai Mayor Prabhakar Pai
Bjp First Mumbai Mayor Prabhakar Paisarkarnama

Bjp First Mumbai Mayor : मुंबईत पहिल्यांदाच नाही तर दुसऱ्यांदा होणार भाजपचा महापौर! 1982 मध्ये रचला होता इतिहास

Bjp Mumbai Mayor Prabhakar Pai : मुंबईत पहिल्यांदाच नाही तर दुसऱ्यांदा होणार भाजपचा महापौर होणार आहे. 1982 मध्ये पहिल्यांदा भाजपला महापौर पद मिळाले होते.
Published on

Mumbai Mayor : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला 89 जागा मिळाल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेसोबत भाजपची युती होती. त्यामुळे भाजपचा महापौर मुंबईत होणार आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच मुंबईचा महापौर होणार असल्याची चर्चा आहे.

मात्र, मुंबईत या पूर्वी देखील भाजपचा महापौर होता, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा भाजपचा नगरसेवक मुंबईचा महापौर होणार असल्याचे सांगितले जाते. 1982 मध्येच डॉ. प्रभाकर संजीव पै हे भाजपचे नेते मुंबईचे महापौर झाले होते.

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी फेसबूक पोस्ट करत या विषयी माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुंबईच्या महापौर पदासाठी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची सेना यांच्यात चाललेल्या अकटोविकट संघर्षात भाजपला महापौर पद मिळालेच तर जो कोणी महापौर होईल तो भारतीय जनता पक्षाचा दुसरा महापौर असेल.

'1982 मध्येच डॉक्टर प्रभाकर संजीवा पै हे मुंबईचे महापौर झाले होते आणि ते भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान नेते होते याची आठवण तेव्हा त्या महापौर कार्यालयात कार्यरत असलेले ज्येष्ठ अधिकारी प्रकाश परांजपे शहापूरकर यांनी करून दिली.', असे देखील अकोलकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Bjp First Mumbai Mayor Prabhakar Pai
Eknath Shinde: ‘काम नाही तर खुर्ची नाही! शिंदेंचा अ‍ॅक्शन प्लॅन! महापालिकेत 'नापास' मंत्र्यांची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी? नव्या चेहऱ्यांना संधी देणार

अकोलकर यांनी पै यांच्याविषयी आठवणी सांगताना म्हटले की, 'पै महापौर असतानाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक शिबीर झाले होते. त्या शिबिरास महापौर असलेले पै हे संघाचे अर्धी चड्डी घालून उपस्थित होते आणि त्यांच्या समवेत तिथे परांजपेही गेले होते.'

Bjp First Mumbai Mayor Prabhakar Pai
NCP Unity Talks : महापालिका निवडणुकीत 'पानिपत', आता जिल्हा परिषदेला दोन्ही राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com