Parbhani News : राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांची फजिती, रागाच्या भरात आधीचे मंजूर केलेले काम रद्द अन् पुन्हा कार्यारंभ आदेश!

Ajit Pawar NCP : निवडणुकीपूर्वी विकासकामाचे भूमिपूजन, निवडणूक निकालानंतर निधी रद्द करणे व जनमानसातून उलट सुलट प्रतिक्रिया आल्यानंतर निधी पूर्ववत देण्याची वेळ आल्याने राजेश विटेकर यांची चांगलीच फजिती झाली.
Rajesh Vitekar
Rajesh Vitekar Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani Politics News : राजकारणी सूडाचे राजकारण करतात असा आरोप नेहमीच केला जातो. एखाद्या गावात, मतदारसंघातील भागातून अपेक्षित मतदान झाले नाही, की मग त्या भागाकडे दुर्लक्ष करायचे, विकास निधी द्यायचा नाही किंवा मंजूर कामे दुसर्‍या क्षेत्रात वळवायचा असे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. पण मतदारांवर अशा प्रकारचा राग कधी कधी अंगलटही येतो.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांच्याबाबतीत असेच काहीसे घडले. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकी दरम्यान, विटेकर यांनी सोनपेठ शहरात विविध विकासकामासाठी निधी मंजूर केला. शहरातील देवी मंदिर विकास कामासाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर या कामाचे भूमिपूजन देखील मोठ्या उत्साहात करण्यात आले. परंतु सोनपेठ शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी मैदानात उतरली.

पाथरी विधानसभा मतदारसंघातील पाथरी मानवत व सोनपेठ या तीन नगरपरिषदांपैकी केवळ मानवत शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय प्राप्त केला. या निकालानंतर सोनपेठ शहरातील भूमिपूजन केलेल्या विकास कामाचा निधी रद्द करण्यात येऊन तो निधी मानवत शहरातील विकास कामासाठी देण्यात आला. मोठ्या उत्साहात भूमिपूजन केलेल्या विकास कामाचा निधी रद्द करण्यात येऊन तो दुसरीकडे वळविण्यात आल्याने सोनपेठ शहरातील देवी मंदिर भक्त परिवारातून उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली.

शहरातील सुधीर बिंदू व कृष्णा पिंगळे यांनी तहसीलदार यांना पत्र देऊन आत्मक्लेष आंदोलनाचा इशारा दिला. नगरपरिषदेत अपेक्षित यश न मिळाल्याने आमदार विटेकर यांनी निधी अन्यत्र वळवला असा आरोप करण्यात आला. मात्र तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने निधी उपयोगात आणण्यासाठी अन्यत्र देण्यात आल्याचे विटेकर यांनी स्पष्ट केले.

Rajesh Vitekar
Kolhapur Mahapalika: 2002 मध्ये निलंबित, 25 वर्षांपासून 1 लाख 60 हजार महिना 'फुकट'चा पगार; 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बाजार उठणार

जनमानसातून होणारा उद्रेक लक्षात घेता आमदार राजेश विटेकर यांनी तातडीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून मानवतमधील विकास कामे रद्द करण्यात यावीत व सोनपेठ शहरातील देवी मंदिर विकासासाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी पत्रातून केली त्यानुसार उपमुख्यमंत्री कार्यालयाने नियोजन विभागाला आदेश दिले.

निवडणुकीपूर्वी विकासकामाचे भूमिपूजन, निवडणूक निकालानंतर निधी रद्द करणे व जनमानसातून उलट सुलट प्रतिक्रिया आल्यानंतर निधी पूर्ववत देण्याची वेळ आल्याने राजेश विटेकर यांची चांगलीच फजिती झाली. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर निधी देणे आणि पुन्हा रद्द करणे या प्रकाराची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com