Latur Crime : वाळू माफियांनी तलाठ्यांना दिले चाबकाचे फटके; गुन्हा दाखल न करता जीव मुठीत घेऊन पळाले

Nilanga Sand Mafia Attack : मंगळवारी गिरकचाळ येथील अवैध गौण खनिज व वाळू उत्खननावर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाचे पथक रवाना झाले होते. कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावरच वाळू माफीयांकडून प्राणघातक हल्ला चढवण्यात आला.
Nilanga Sand Mafia Attack | Talathi Assault Case
Nilanga Sand Mafia Attack | Talathi Assault CaseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Latur News, 27 Nov : निलंगा तालु्यातील गिरकचाळ येथे अवैध वाळू साठवणूक व वाहतुक करणाऱ्यावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावरच वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमारे तीस ते ४० जणांच्या जमावाने शासकीय वाहनावर दगडफेक करत तलाठ्यांना पट्ट्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (ता. 24) घडला.

शिवाय हल्ल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांवरही माफियांची इतकी दहशत इतकी होती की, ते पुन्हा मारहाणीच्या भीती पोटी पोलीस ठाण्यातून तक्रारी विना माघारी परतले. त्यामुळे सध्या तालुक्यात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू असून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा प्रकार झाल्याने महसूल प्रशासनाची झालेली 'बेअब्रु' कशी भरून निघणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गिरकचाळ येथील अवैध गौण खनिज व वाळू उत्खननावर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाचे पथक रवाना झाले होते. कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावरच वाळू माफीयांकडून प्राणघातक हल्ला चढवण्यात आला. सुमारे तीस ते ४० जणांच्या जमावाने वाहनावर दगडफेक करत तलाठ्यांना पट्ट्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, हल्ल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव वाचवत तक्रार न देताच माघारी फिरले.

या घटनेमुळे परिसरात वाळू माफियांचा सुळसुळाट आणि प्रशासनाची हतबलता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या पथकात गिरकचाळचे तलाठी राजाभाऊ कांबळे, काटेजवळगावचे तलाठी आणि इतर महसूल कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पथकाची गाडी घटनास्थळी पोहोचताच वाळू माफियांच्या टोळक्याने गाडी अडवली व वाहनावर जोरदार दगडफेक केली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले. यानंतर संतप्त झालेल्या माफियांनी तलाठी राजाभाऊ कांबळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना घेरले व चाबकाने, पट्ट्याने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

Nilanga Sand Mafia Attack | Talathi Assault Case
Dattatray Bharne : 'अजितदादा हे दादाच होते...'; सुप्रिया सुळेंच्या 'त्या' वक्तव्यावर दत्तात्रय भरणेंचं सूचक वक्तव्य

पाठ, हात आणि पायांवर गंभीर मार लागल्याने कर्मचारी जखमी झाले. आमच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशानेच हा हल्ला करण्यात आला, असा आरोप तलाठी राजाभाऊ कांबळे यांनी केला आहे. ​हल्ल्यानंतर सुरवसे नावाचे तलाठी व महसूल कर्मचारी गुन्हा दाखल करण्यासाठी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, माफियांची दहशत आणि पुन्हा मारहाण होण्याची भीती यामुळे कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल न करताच माघार घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ज्या यंत्रणेवर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, त्याच व्यवस्थेसमोर जर शासकीय कर्मचारी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हतबल होत असतील, तर सर्वसामान्यांचे काय, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील ​गिरकचाळ, धनेगाव, शिरोळ, वांजरवाडा, हेळंब, कोकळगाव, मदनसुरी यासह आदी परिसरातील वाळू माफियांना स्थानिक राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींचा वरदहस्त लाभल्याची चर्चा आहे.

Nilanga Sand Mafia Attack | Talathi Assault Case
Nashik Court Bomb Threat: नाशिक जिल्हा न्यायालयात बॉम्ब असल्याच्या फोनने खळबळ; पण शेवटी 'लकी' आणि 'अल्फा'ने असं काही केलं की...

त्यामुळेच पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून या माफियांवर ठोस कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते, असा आरोप होत आहे. यापूर्वी दहा वर्षांपूर्वी याच गिरकचाळ गावात एका पोलीस निरीक्षकाला बेदम मारहाण झाली होती. तर या ठिकाणी यापूर्वी 144 कलम लागू करून जमावबंदी आदेश लागू केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.