Dattatray Bharne : 'अजितदादा हे दादाच होते...'; सुप्रिया सुळेंच्या 'त्या' वक्तव्यावर दत्तात्रय भरणेंचं सूचक वक्तव्य

Pune Law and Order : पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बोलताना भरणे यांनी पोलीस प्रशासन गांभीर्याने कारवाई करत असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या चांगले काम करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील कार्यक्षम आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाबाबत कोणीही शंका घेऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
ajit pawar | dattatray Bharne
ajit pawar | dattatray Bharnesarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News, 27 Nov : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात एका युवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकत्व स्वीकारावे, अशी मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्याबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

सुप्रिया सुळे यांनी अजित पवार पालकमंत्री असताना पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर वचक होता. मात्र, आता तो कमी होत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुण्याचे पालकत्व घ्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. यावरून पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत विचारले असता दत्तात्रय भरणे म्हणाले, "सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबातील आहेत. त्यांना अजितदादांची कार्यशैली माहीत होती. त्याचप्रमाणे सुनेत्रावहिनी यांची कार्यपद्धतीदेखील त्यांना चांगली माहीत असावी. त्यामुळे त्यांनी केलेल्या विधानाचा वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न करू नये. असे करणे योग्य ठरणार नाही."

ajit pawar | dattatray Bharne
NCP Politics : पार्थ पवारांकडून राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांना धक्का? 5 महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या नेत्याची मुंबईच्या युवक अध्यक्षपदी नियुक्ती

पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बोलताना भरणे यांनी पोलीस प्रशासन गांभीर्याने कारवाई करत असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या चांगले काम करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील कार्यक्षम आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाबाबत कोणीही शंका घेऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

ajit pawar | dattatray Bharne
BJP Bhandara : 'महायुती सरकारने आमदार खासदारांना महाराष्ट्र लुटायला मोकळीक दिलेय...'; भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मात्र, या सगळ्या चर्चेदरम्यान भरणे यांनी, "शेवटी अजितदादा हे दादाच होते," असे सूचक विधान केले. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीचे महत्त्व अधोरेखित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात झालेल्या हल्ल्यामुळे पुणे शहरातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, या घटनेनंतर पोलीस प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.