Omraje Nimbalkar : नितेश राणेंनी धाराशिवमध्ये जाऊन ललकारलं... ठाकरेंचा वाघ भिडला, जशास तसं प्रत्युत्तर!

Nitesh Rane Dharashiv speech news : लोकशाहीमध्ये आपण निवडून आलो, आपली सत्ता आली म्हणजे आपण बाप झालो असे नाही. ही सत्तेची मस्ती आहे. जनता ही मस्ती लवकरच उतरवेल, असा थेट इशाराच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला आहे.
Omraje Nimbalkar
Omraje NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : धाराशिव येथील कार्यक्रमप्रसंगी मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली होती. राणे यांनी केलेल्या या विधानाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटण्यास सुरुवात झाली आहे. लोकशाहीमध्ये आपण निवडून आलो, आपली सत्ता आली म्हणजे आपण बाप झालो असे नाही. ही सत्तेची मस्ती आहे. जनता ही मस्ती लवकरच उतरवेल, असा थेट इशाराच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला आहे.

धाराशिव जिल्ह्यात भाजपच्या (Bjp) मेळाव्यात बोलताना राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. जिल्हा नियोजन समितीच्या कामांवर स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी थेट इशाराच दिला आहे. नितेश राणे म्हणाले, "सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा." त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. नितेश राणे यांच्या वक्तव्यबद्दल त्यांचे मोठे बंधू निलेश राणे यांनी सल्ला दिला आहे.

Omraje Nimbalkar
Shivsena UBT-MNS : भाऊ-भाऊ फक्त एकत्रच येणार नाहीत... उद्धव अन् राज ठाकरेंच्या डोक्यात आहे वेगळाच प्लॅन!

त्यांच्या या विधानाचा समाचार आता ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी घेतला आहे. ओमराजे यांनी नितेश राणे यांना जशास तसे उत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील जनतेला लक्षात आले असेल की आपण टाकलेल्या मतांची सूज नितेश राणे यांना कशी आलेली आहे. सत्ता आली म्हणजे आपणच मालक झालो असे नसते. मला वाटते अशा पद्धतीचं जे वागणं आहे, त्याची सूज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल ओमराजे निंबाळकर यांनी केला.

Omraje Nimbalkar
Raj-Uddhav Thackeray Alliance: राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्यास नाशिकमध्ये होणार 'या' पक्षांची अडचण?

महाराष्ट्रातील दोन नंबरचे मताधिक्य

नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे या तिघांपेक्षा जास्त मतानी मी निवडून आलो आहे. लोकशाहीमध्ये जनता ही बाप असते. धाराशिव लोकसभा मंतदारसंघातून मी तीन लाख 29 हजार 48 मतांनी निवडून आलो. महाराष्ट्रातील दोन नंबरचे मताधिक्य देऊन मला जनतेने संसदेत पाठवले, असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी नितेश राणे यांना लगावला.

Omraje Nimbalkar
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या मास्टरस्ट्रोकमुळे भाजपमध्येच वादळ, नाशिकच्या तिन्ही आमदारांमध्ये अस्वस्थता

धाराशिवमध्ये निधीवरून भाजप, शिवसेनेत सुप्त संघर्ष

धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून भाजप आणि शिवसेनेत सुप्त संघर्ष आहे. शिवसेने नेते असलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या तक्रारीनंतर स्थगिती देण्यात आली आहे. त्याच, अनुषंगाने भाजपच्या मेळाव्यात बोलताना नितेश राणेंनी शिवसेना नेत्यांना थेट इशारा दिला आहे.

Omraje Nimbalkar
Shiv Sena MNS Alliance : उद्धव-राज भाऊ भाऊ, झाले गेले विसरून जाऊ..!

नितेशने जपून बोलले पाहिजे

निलेश राणे यांनी सोशल मिडिया एक्सवरती पोस्ट लिहली आहे, पोस्टमध्ये, नितेशने जपून बोलावे... मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे. पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.

Omraje Nimbalkar
Fadnavis on Rahul Gandhi : राहुल गांधींच्या 'पाच' टप्प्यांची CM फडणवीसांकडून चिरफाड; एका लेखात विषयच संपवला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com