Vinay Kore-Narendra Modi
Vinay Kore-Narendra ModiSarkarnama

Ethanol Production Issue : मोदींना मित्र पक्षाचा घरचा आहेर; ‘इथेनॉल बंदीबाबत पवार-फडणवीसांनी या गोष्टींचा आग्रह करावा’

Vinay Kore News : केंद्र सरकारने चार दिवसांपूर्वी उसापासून इथेनॉल निर्मितीला बंदी घातल्यानंतर कारखानदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

kolhapur news : केंद्र सरकारने चार दिवसांपूर्वी उसापासून इथेनॉल निर्मितीला बंदी घातल्यानंतर कारखानदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्यातील कारखानदारांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. महायुतीतील मित्रपक्षानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घरचा आहेर दिला आहे. जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी केंद्र सरकारचा हा निर्णय दुर्दैवी असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला मारक असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जी-20 परिषदेच्या एका निर्णयावरही बोट ठेवले आहे. (Vinay Kore criticized the central government over the ban on ethanol production)

इथेनॉल निर्मितीस बंदी करणारा केंद्र सरकारचा निर्णय दुर्देवी आहे. साखरेचे उत्पादन आणि वापर यांच्यामुळे निर्माण झालेली तफावत त्यामुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vinay Kore-Narendra Modi
Shahaji Patil News: शहाजीबापूंनी चिमटा तर काढला, मात्र त्याची किंमत चुकवावी लागणार...?

कोरे म्हणाले की, केंद्र सरकारचा हा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला मारक ठरणारा आहे. इथेनॉल निर्मिती वरील बंदीचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार आहे. जी-20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायो फ्युल वापर करण्याची ठराव केला. त्याला विसंगत ठरणारा हा निर्णय आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तोटा सहन करावा आणि उद्योगजकांना स्वस्तात साखर मिळावी, अशा प्रकारचा एक विचार पुढे नेणारा आहे. हा निर्णय महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादकांच्या दृष्टीने नुकसान करणार आहे, त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार होण्याची गरज आहे, असेही आमदार विनायक मोरे यांनी मत व्यक्त केले.

Vinay Kore-Narendra Modi
Winter Session 2023 : अजितदादांना आता मुख्यमंत्री करा, मी माझ्या पक्षाच्या पाठिंब्याची हमी घेतो; शिवसेना नेत्याची ऑफर

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघेही दिल्लीला यासाठी जाणार होते. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची बाजू त्यांनी सांगणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या कारखान्याने त्याच्यासाठी केलेली गुंतवणूक, त्याचा कारखानदारीवर होणारा परिणाम हा विषय प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे, असेही त्यांनी नमूद केले.

महागाई आटोक्यात ठेवायची असेल तर ड्युएल प्राइजिंग सिस्टम करावी. घरगुती वापराच्या साखरेचा दर वेगळा आणि उत्पादन खरेदी दर वेगळा अशा प्रकारचा आग्रह यांनी या मीटिंगमध्ये करणे आवश्यक असल्याचे आमदार विनय कोरे यांनी सांगितले.

Vinay Kore-Narendra Modi
Winter Session 2023 : 'एनआयए'च्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करताच अबू आझमींवर भाजप आमदार तुटून पडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com