Pandharpur News : पंढरपुरातील सकल मराठा समाजामध्ये कार्तिकी यात्रनिमित्ताने होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवरून दोन गट पडले आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यास आपला विरोध नसल्याचे एका गटाने जाहीर केले आहे. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला मराठा क्रांती मोर्चाने आपला विरोध कायम असल्याची भूमिका मांडली आहे. विठ्ठलाच्या महापूजेवरून दोन परस्पर भूमिकांमुळे सकल मराठा समाजामध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. (Maratha community split in Pandharpur due to Kartiki's Maha Puja by the Deputy CM)
सकल मराठा समाजाच्या वतीने ८ सप्टेंबरपासून पंढरपुरातील तहसील कार्यालयासमोर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला या आंदोलनादरम्यान विरोध दर्शवला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आपल्या निर्णयावर सकल मराठा समाज शनिवारपर्यंत (ता. १८ नोव्हेंबर) ठाम होता. मात्र, आज काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकीच्या शासकीय महापूजेला आमचा विरोध नाही, अशी भूमिका मांडली. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला आपला विरोध कायम आहे, असे जाहीर केले. विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवरून दोन परस्पर भूमिका घेतल्याने पंढरपुरातील सकल मराठा समाजामध्ये दोन गट पडले आहेत.
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला आमचा विरोध नसल्याचे माजी उपनगराध्यक्ष तथा सकल मराठा समाजाचे नागेश भोसले यांनी सांगितले. मात्र, मराठा क्रांती मोर्चाने आपला विरोध कायम असल्याचे जाहीर केले. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात येऊ नये; अन्यथा होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार असेल, असा थेट इशारा दिला.
सकल मराठा समाजामध्ये दोन गट पडल्याने उपमुख्यमंत्री कार्तिकीच्या महापूजेला येणार का, त्यातही देवेंद्र फडणवीस येणार की अजित पवार, की दोन्ही उपमुख्यमंत्री विठ्ठलाच्या पूजेसाठी येणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.