Dharashiv News : 'त्यांनी एकदा जनतेतून निवडणूक लढवावी' : ओम राजेनिंबाळकरांचा पहिल्यांदा संयम सुटला; टीका करताना ठाकरेंच्या नेत्याची काढली लायकी

Dharashiv political News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या बड्या नेत्यावर पहिल्यांदाच टीका करताना लायकीच काढली.
Om rajeNimbalkar
Om rajeNimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv news : धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी दौऱ्यावर होते. या वेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह खासदार ओम राजेनिंबाळकर व अन्य आमदार देखील उपस्थित होते. मात्र, यावेळी मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यातील फोटो एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी 'काय होतास तू काय झालास तू' अशी टीका केली होती. मात्र, जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यापासून धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या बड्या नेत्यावर पहिल्यांदाच टीका करताना लायकीच काढली.

धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर (Om rajenimbalkar) यांनी सहा खासदारांसोबत उद्धव ठाकरे यांच्या सेनेची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळेस पासून सातत्याने त्यांना टार्गेट केले जात आहे. दुसरीकडे तेव्हापासून राजेनिंबाळकरांनी उद्धव सेनेवर टीका केली नाही. पण आता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार अंबादास दानवे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका करताना लायकीच काढली आहे.

दानवेंच्या सोशल मीडियावरील पोस्टला प्रत्युत्तर देताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, '2029 ला धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आव्हान त्यांनी दिले. एकदा जनतेतून निवडणूक लढवावी म्हणजे स्वतःची लायकी कळेल. काही लोकांना काहीच काम नाही, उठायचं आणि सोशल मीडियावर पोस्ट करायची,' असा टोला त्यांनी लगावला.

Om rajeNimbalkar
​Raj Thackeray : 'राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत', अमित ठाकरेंच्या साकड्यावर शिंदेंच्या मंत्र्याचा टोला; 'आधी आमदार निवडून आणा'

मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यातील फोटो एक्सवर पोस्ट करत अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी “काय होतास तू काय झालास तू “अशी टीका केली होती. त्यावर निंबाळकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून एक दिवस माझ्यासोबत या आणि मी जेवढे फोन उचलतो, त्याच्या दहा टक्के तुम्ही फोन घेऊन दाखवा, असे आव्हानही ओम राजेनिंबाळकर यांनी दानवेंना दिले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वाहनात राणा पाटील यांच्यासोबत प्रवास करण्याबाबत ओम राजेनिंबाळकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जिल्ह्यातील शेतकरी, पाण्याचा प्रश्न आणि पीक विम्याच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांशी थेट बोलण्यासाठी मी गाडीत बसलो, त्या गाडीमध्ये मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि पालकमंत्री प्रताप सरनाईकही होते. मुख्यमंत्र्यांना बोलायचं म्हटलं तर कोणाचे तोंड बघण्याची गरज पडत नाही, असे म्हणत त्यांनी राणा पाटील यांच्यासोबतच्या प्रवासाचे राजकीय स्पष्टीकरण दिले.

Om rajeNimbalkar
Dharashiv Politics: 'कैलास पाटील 'ऑपरेशन टायगर 2' चा भाग..'; धाराशिवच्या पालकमंत्र्यांनीच दिले राजकीय भूकंपाचे संकेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com