​Raj Thackeray CM : 'राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत', अमित ठाकरेंच्या साकड्यावर शिंदेंच्या मंत्र्याचा टोला; 'आधी आमदार निवडून आणा'

Bharat Gogawale Reaction on Amit Thackeray Ganeshotsav Statement Raj Thackeray CM : मनसे नेते अमित ठाकरे यांनी वडील राज ठाकरे यांच्यासाठी गणरायाकडे साकडे घातले असून ते राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. यानंतर आता राजकीय वाद रंगला असून यावर भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेकडून टीका केली जातेय.
Raj Thackeray Chief Minister Statement; Bharat Gogawale And Amit Thackeray
Raj Thackeray Chief Minister Statement; Bharat Gogawale And Amit Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Raigad News : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यावरून राजकीय वादात सापडलेले मनसे नेते अमित ठाकरे यांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अमित ठाकरे यांनी वडील राज ठाकरे यांच्यासाठी गणरायाकडे साकडे घातले आहे. तर ते राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या साकड्यावरून आता राज्याच्या राजकारणात चर्चा होताना दिसत असून यावरून भाजपने पलटवार करत टीका केली आहे.

या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. सध्या राज्यात या मुद्द्यावरून राजकीय रण तापले असतानाच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी 'आधी आमदार निवडून आणा' असा टोला अमित ठाकरे यांना लगावला आहे. ते पुणे येथे पत्रकारांशी बोलत होते.

राज ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा अमित ठाकरे यांनी व्यक्त केल्याने आता वाद सुरू झाला आहे. भाजपने यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री होण्यासाठी विधानसभेत सदस्यांचा आकडा लागतो, अशी टीका केली आहे. तर या टीकेला उत्तर देताना राऊत यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असे तुम्हाला तरी वाटलं होतं का? पण ते मुख्यमंत्री झाले. मग राज ठाकरे मुख्यमंत्री होण्याबाबत अमित ठाकरे यांनी अपेक्षा बाळगली तर चूक काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

अमित ठाकरे यांनी घातलेल्या साकड्यावरून गोगावले यांनी टोला लगावला आहे. गोगावले यांनी, प्रत्येक मुलाला आपले वडील मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटते. त्यात अमित ठाकरे यांचे काय चूकलं? मात्र, मुख्यमंत्री होण्यासाठी आवश्यक असलेले १४५ आमदारांचे बहुमत लागतं. आधी ते त्यांनी मिळवून दाखवावं.

Raj Thackeray Chief Minister Statement; Bharat Gogawale And Amit Thackeray
Raj Thackeray News: आधी 'डिजिटल'चा सापळा, आता UPI पेमेंटवरची शुल्क आकारणी म्हणजे सरकारची तुमच्या दारावर 'टकटक'; राज ठाकरेंनी केलं सावध

पूर्वी राज ठाकरे यांच्या मनसेकडं १३ आमदार होते. नंतर एक आमदार राहिला आणि आता तर एकही नाही. आमदारांची संख्या शून्यावर आली आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी १४५ आमदारांचे बहुमत लागतं. ते आमदार आधी त्यांनी निवडून आणावेत असा टोला गोगावले यांनी लगावला आहे.

उघड पणे आपल्या मनातील साकडं सागायचं नसतं असा सल्लाही अमित ठाकरे यांना देताना गोगावले म्हणाले की, आम्ही घरचे गणपती गेले की आम्ही दुसऱ्याच दिवशी पुण्याला येतो. येथे दर्शन घेऊन मगच मुंबईला जातो. तर काही मागायचं असेल तर ते उघड पणे नाही तर ते मनात ठेवायचं असतं. इश्वर सांगत असतो की गाजावाजा करू नको. तुम्हा जे पाहिजे ते गुपचूप माग. त्या प्रमाणे आम्ही मागतो. जसं मी आधी मंत्री व्हावं म्हणून साकडं घालत होतो. त्यांतर पालकमंत्रिपदासाठी साकडं घालत होतो. आता पुढच्या मागण्या मान्य झाल्या की तुम्हाला सांगतो, असा चिमटा त्यांनी अमित ठाकरे यांना काढला आहे.

आधी काजू-बदाम आणि त्यानंतर बैठक सुरू असताना गेम खेळणारे अधिकारी यांचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार का असा सवाल त्यांना करण्यात आला. यावेळी त्यांनी, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली असून यात जर कोणी अधिकारी दोषी आढळला तर कारवाई करण्यात येणार आहे.

Raj Thackeray Chief Minister Statement; Bharat Gogawale And Amit Thackeray
Raj Thackeray : मोदींचा हटवलेला फोटो, शाहांवरील टीका खटकली, फडणवीस- शिंदेंनी राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर बाप्पांच्या दर्शनाला जाणं टाळलं ?

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असून ती केली जाणार का असा प्रश्न विचारला असता गोगावले म्हणाले की, मागणारे अनेक जण असतात. मात्र निर्णय घेऊन देणारे आम्ही सरकार आहोत. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. यामुळे कोणी द्या म्हणाले म्हणून आम्ही देऊ असे काही नाही. आम्हाला राज्यातील सध्य स्थिती दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही गांभीर्याने लक्ष देत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com