Dharashiv MLC Election : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, खासदार ओमराजेंच्या समोरच 4 नगरसेवक फुटले, थेट भाजप नेत्यासोबत...

Omraje Nimbalkar Shiv Sena UBT Sachin Pawar : विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. धाराशिवची जबाबदारी असणाऱ्या खासदार ओमराजे यांच्या समोर चार नगरसेवक भाजपसोबत घेतल्याचे दिसून आले.
MP Omraje NImbalkar-Uddhav Thackearay
MP Omraje NImbalkar-Uddhav Thackearay Sarkarnama
Published on
Updated on

Omraje Nimbalka News : विधान परिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा फटका बसत असल्याचे दिसत आहे. कोकणात ठाकरेंच्या उमेदवाराने माघार घेण्यासाठी थेट मंत्री नितेश राणेंसोबत आले. तर, नाशिकमध्ये ज्याला उमेदवारी दिली त्याने उमदेवारीच दाखल केली नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील उमेदवाराने परस्पर उमेदवारी मागे घेतील. हे सर्व सुरू असताना उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीत थेट ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले.

या मतदारंसघातून महाविकास आघाडी एकत्र आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होता. मात्र, ठाकरेंचे नगरसेवक सचिन पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी मागे घेण्याची दिवशी बंडखोरी रोखण्यासाठी स्वतः खासदार ओमराजे निंबाळकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख विरुद्ध भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांच्यात लढत होणार आहे.

पवार हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आले. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी प्रयत्न केले. पवार यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत जात आपला अर्ज मागे घेतला. त्यावेळी खासदार निंबाळकर हे देखील जिल्हाधिकारी कार्यालयातच उपस्थित होते. विशेष म्हणजे पवार यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेतील आणखी चार नगरसेवक होते. त्यामुळे मूळ पक्षाच्या धोरणाशी फारकत घेत या नगरसेवकांच्या गटाने भाजपसोबत जाणे पसंत केल्याचे दिसले.

MP Omraje NImbalkar-Uddhav Thackearay
Nagaradhyaksha Election : कोकण विधानपरिषद निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीने उधळला गुलाल; सुनील तटकरेंच्या मास्टरस्ट्रोकने फिरला गेम

उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सचिन पवार आणि इतर नगरसेवकांनी ओमराजे यांची भेट टाळून भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासोबत फोटो काढले. त्यामुळे ठाकरे सेनेतील नगरसेवकांमध्ये उघडपणे दोन गट पडल्याची चर्चा आहे.

सचिन पवारांवर कारवाईत अडथळा?

धाराशिव पालिकेत सचिन पवार हे नगरसेवक आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना व्हीपचे अधिकारी दिले आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे व्हीपचे अधिकारी आहेत त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेऊन कारवाई कशी करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

MP Omraje NImbalkar-Uddhav Thackearay
MLC Election : शिंदेंच्या आदेशानंतर दुखावलेल्या आमदाराची भावनिक पोस्ट, 'माझ्याच नेत्यांनी माझा..., पण...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com