Omraje warning : ओमराजे आक्रमक; थेट इशारा देत म्हणाले, 'खोट्या मंडळींना पुरून उरणार...'

Omraje aggressive statement News : तुळजापुरातील ड्रग्ज रॅकेटवरून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Omraje Nimbalkar
Omraje NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : धाराशिव जिल्ह्यातील डीपीडीसी बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोरच खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार राणाजगजीतसिंह पाटील या दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामधील सत्ताधारी व विरोधकांकडून एकेमकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच तुळजापुरातील ड्रग्ज रॅकेटवरून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली असून येत्या काळात ड्रग्ज रॅकेटचा पाठपुरावा करून खोट्या मंडळींना पुरून उरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

तुळजापुरातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणात काही राजकीय नेतेमंडळी अडकल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. त्यामुळे यावरून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विरोधकांवर टीका केली आहे. जेव्हा तुम्ही युद्धात जिंकू शकत नाही तेव्हा कारस्थान करून निदान प्रतिमा तरी मलिन करू असा आसुरी आनंद घेण्याचे काहींचे मनसुबे आहेत. पण ड्रग्ज प्रकरणाचा यापुढे मीच पाठपुरावा करणार असून 'दूध का दूध आणि पानी का पानी' करू," असा इशारा खासदार ओमराजेंनी (Omraje Nimbalkar) दिला.

Omraje Nimbalkar
Ajit Pawar Sharad Pawar BJP : अजितदादांचा शरद पवारांना थेट सवाल; 'भाजप का नाही?'

जेव्हा युद्धात जिंकता येत नाही तेव्हा कटकारस्थान सुरू होते. सार्वजनिक आयुष्यात असताना मी एकच नियम पाळला आहे, तो म्हणजे मी कायम जनतेला सहज उपलब्ध असेन आणि शक्य तसे त्यांच्या प्रश्नांना न्याय देईन. हे करताना माझे आणि लोकांचे असे नाते जुळून आले की मला त्यांच्या मनातून कोणीही काढू शकत नाही. तुळजापुरातील ड्रग्ज रॅकेटचा यापुढे मी पाठपुरावा करणार असून खोट्या लोकांना मी पुरून उरेन, अशा शब्दांत खासदार निंबाळकर यांनी आरोप करणाऱ्यांना फटकारले आहे.

Omraje Nimbalkar
NCP symbol dispute : मोठी बातमी ! घड्याळ चिन्ह अन् राष्ट्रवादी दादांची की साहेबांची? कोर्टाचा निर्णय होणार 'या' तारखेला

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधक वारेमाप पैशाचे वाटप करूनही जिंकू शकत नाही, हे त्यांनी सतत अनुभवले आहे. मला लोकांनी दिलेली 3 लाख 30 हजार मतांची आघाडी हेच यांच्या पोटदुखीचे मुख्य कारण असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट करीत भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinh Patil) यांनी नाव न घेता टोला लगावला.

Omraje Nimbalkar
Shivsena Conflict : मोठी बातमी! धनुष्यबाण, शिवसेना पक्ष ठाकरेंचा की शिंदेंचा? कोर्टाच्या निर्णयाची तारीख ठरली! तब्बल दीड वर्षानंतर सुनावणी

गेल्या काही दिवसापासून विरोधक माझी प्रतिमा मलीन करण्याच्या नियोजनाचा भाग म्हणून खोट बोल पण रेटून बोल या नीतीने विरोधक मला टार्गेट करत असताना मी काय आहे हे जनता जाणून आहे. ज्या ड्रग्जबद्दल मी सगळ्यात पहिले संसदेत आवाज उठवला, प्रेस घेऊन सत्य समोर आलेच पाहिजे, अशी भूमिका मांडली, त्या प्रकरणात मुद्दाम सातत्याने आरोप करून विरोधक राजकीय पोळी भाजत आहेत.

Omraje Nimbalkar
Ajit Pawar Sharad Pawar BJP : अजितदादांचा शरद पवारांना थेट सवाल; 'भाजप का नाही?'

मी राजकारणात पैसे कमावण्यासाठी असतो तर आतापर्यंत गद्दारी करून शेकडो कोटी रुपयांची माया सहज जमवली असती. पण मला राजकारणासाठी आणि निवडून येण्यासाठी पैशांची गरज नाही. आता या सर्व प्रकरणाचा मीच पाठपुरावा करणार असून लोकांना एकच विनंती आहे की तुम्ही जे प्रेम कायम दाखवत आहात ते असेच ठेवा, बाकी खोट्या लोकांना हा ओमराजे पुरून उरतो, असा इशारा ओमराजे निंबाळकर यांनी विरोधकांना दिला.

Omraje Nimbalkar
NCP Politics : अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी जयंत पाटलांच्या शुभेच्छा, म्हणाले 'पाच वर्ष तरी...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com