Omraje Nimbalkar: महिला मराठा आंदोलकांनी जालन्यात ओमराजेंची गाडी अडवली; म्हणाल्या,संसदेत फक्त प्रश्न मांडू नका तर...!

Omraje Nimbalkar Meet Manoj Jarange Patil In Antarwali Sarati : लोकसभा निवडणकीत मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट दिसून आल्यानंतर जरांगेंच्या भेटीसाठी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या नेतेमंडळींनी रांग लावली आहे.
MP Omprakash Rajenimbalkar
MP Omprakash Rajenimbalkar sarkarnama

Jalna News: मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन उभारुन महायुती सरकारला घाम फोडणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत.त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालवत चालली आहे.लोकसभा निवडणकीत मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट दिसून आल्यानंतर जरांगेंच्या भेटीसाठी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या नेतेमंडळींनी रांग लावली आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघातून तब्बल साडे तीन लाखांच्या मताधिक्क्याने निवडून आलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांसह (Omraje Nimbalkar) धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी अंतरवालीत येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मराठा महिला आंदोलकांनी खासदार ओमराजेंची गाडी अडवत त्यांना गराडा घातला.तसेच संसदेत मराठा आरक्षणाचा फक्त प्रश्न मांडून फक्त न थांबता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी थेट सभागृह बंद पाडण्याची मागणी केली आहे.

आरक्षणासाठी काय करणार असा सवालही यावेळी उपस्थित महिला आंदोलकांनी ओमराजेंना केला. खासदारांनीही या आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.याचवेळी त्यांनी आरक्षणाचा प्रश्न संसदेत उचलून धरणार असल्याचेही सांगितले.

तसेच केंद्र सरकारने आता मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय कायमस्वरुपी निकाली काढण्याच्या दृष्टीने मार्ग काढावा. यासाठी आम्ही केंद्रात आवाज उठवू, सरकारच्या मागे लागू अशी भूमिका स्पष्ट करतानाच या देशाचा भाग असलेल्या तामिळनाडूसारख्या एका राज्यातील आरक्षण मर्यादा ओलांडून सुद्धा टिकते,मग महाराष्ट्रात हे का घडू शकत नाही? असा सवालही ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी केला.

MP Omprakash Rajenimbalkar
Nana Patole : लोकसभेच्या दणदणीत यशानंतर नाना पटोले पुन्हा 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, माजी आमदाराचं निलंबन

दरम्यान, सरकारने मनोज जरांगे पाटील आणि मराठ समाजाला दिलेले आश्वासन पाळले नाही. समाजाची मोठी फसवणूक सरकारने केल्याची भावना मराठा बांधवांमध्ये निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणाचा लढा हा समाजाचा लढा आहे, त्याकडे राजकारण म्हणून पाहू नये. सरकारने या उपोषणाची दखल घेऊन तातडीने पावले उचलली पाहिजे, अशी अपेक्षा ओमराजे यांनी व्यक्त केली.

तामिळनाडू सरकारने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली असतांना ते टिकले. मग आपले आरक्षण का टिकू शकत नाही? केंद्र सरकारकडे आम्ही वारंवार या संदर्भात विनंती करत आहोत. मात्र सरकारचा या मुद्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. यातून समाजामध्ये रोष वाढतो आहे. मराठा आरक्षण हा एक सामाजिक लढा आहे, त्याकडे राजकारण म्हणून पाहू नका.मराठा आरक्षणाच्या तुमच्या लढ्याला आमचा पाठिंबा असल्याचेही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

MP Omprakash Rajenimbalkar
Manoj Jarange On CM Eknath Shinde : मनोज जरांगेंचा मोठा आरोप; मुख्यमंत्र्यांच्या 'OSD' च्या साथीला फडणवीसांची माणसं, दिल्लीतून मराठ्यांविरोधात षडयंत्र...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com