Omraje Nimbalkar Vs Archana Patil: अर्चना पाटलांच्या अजूनही पराभव पचनी पडेना? खासदार ओमराजेंविरोधात मोठी खेळी, अडचणी वाढणार

Dharashiv Loksabha News : धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांचा दारुण पराभव केला होता.
Archana Patil- Omraje Nimbalkar
Archana Patil- Omraje NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News: लोकसभा निवडणुकीत राज्यात अनेक लढती चर्चेचा विषय ठरला होता. त्यात काही लढतींमध्ये दिग्गज नेत्यांचा पराभव करत जायंट किलर ठरले होते.पण हा पराभव काही जणांच्या अद्यापही पचनी पडलेला दिसत नाही.

मुंबईतील शिंदे गटाच्या रविंद वायकरांच्या विजयावर आक्षेप नोंदवल्यानंतर आता धाराशिव लोकसभा मतदारसंघातही नवा ट्विवस्ट निर्माण झाला आहे.त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांचा दारुण पराभव केला होता.धाराशिवमध्ये जवळपास तीन लाखांहून अधिक मताधिक्क्यांनी बाजी मारल्यानंतर आता ओमराजेंचं मातोश्रीसह राज्याच्या राजकारणात वजनही चांगलंच वाढलं आहे. पण आता याच ओमराजेंना अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील यांनी मोठी खेळी खेळली आहे.

अर्चना पाटील यांच्या उमेदवार प्रतिनिधींनी तक्रार केली होती.लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी धाराशिव येथील मतमोजणी केंद्रात ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे त्यांच्या अंगरक्षकांसह वावरताना दिसून आले होते.

Archana Patil- Omraje Nimbalkar
Dhule Politics: 'सेटलमेंट' वरुन आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली; धुळ्याचा विकास कुणी केला?

आता त्याच पार्श्वभूमीवर मतमोजणी अधिकारी , कर्मचाऱ्यांवर दबाव निर्माण झाला आणि आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार रेवणसिद्ध लामतुरे यांनी दाखल केली होती. या तक्रारीनंतर ओमराजेंसमोर नवा पेच निर्माण होणार असल्याचे बोलले जात होते.

आता याप्रकरणी धाराशिवचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ओम्बासे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Archana Patil- Omraje Nimbalkar
Nilesh Lanke : लंकेंनी 'LCB'च्या हप्त्यांचं रेटकार्ड केलं जाहीर; भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आल्यानं 'LCB' पुरती घायाळ

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील (RanaJagjitsinha Patil) यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्यात हायव्होल्टेज लढत पाहायला मिळाली होती. खासदार निंबाळकर आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्यातलं वैर अगदी टोकाला गेल्याचं पाहायला मिळालं आहे.

विशेष म्हणजे अर्चना पाटलांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली होती.पण या लढतीत ओमराजेंनी एकहाती विजय मिळवत अर्चना पाटील यांचा तब्बल 3 लाख 29 हजार 846 मतांनी पराभव केला होता.

Archana Patil- Omraje Nimbalkar
Ajit Pawar News : अमित शहांकडे केली अजितदादांनी मोठी मागणी; विधानसभेच्या 'त्या' सहा जागेवर केला दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com