Thackeray Vs Shinde: 'ऑपरेशन टायगर' यशस्वी केलेल्या बड्या नेत्याला दाखवले काळे झेंडे; उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांची थोपटली पाठ

Shivsena News: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफ्याला उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यांनी काळे झेंडे दाखवत त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Uddhav-Thackeray-Eknath-ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : खासदार श्रीकांत शिंदे, नागेश पाटील आष्टीकर यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून संताप व्यक्त करणाऱ्या शिवसैनिकांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठ थोपटली. ऑपरेशन टायगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटले. यात मराठवाड्यातील नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांचा समावेश आहे. या खासदारांच्या विरोधात आॅपरेशन तुडवा, राबवा असे आदेश खासदार संजय राऊत यांनी दिले होते.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफ्याला उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यांनी काळे झेंडे दाखवत त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. शिंदे यांच्यासोबत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे देखील होते. आपल्या शिवसैनिकांनी दाखवलेल्या या धाडसाचे स्वतः उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले.

नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यात संतप्त शिवसैनिकांनी शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. या घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्याशी संवाद साधला. 'तुमच्या सर्वांच्या मी पाठिशी आहे, काळजी करू नका, तुम्ही चांगले काम करत आहात, गद्दाराच्या विरोधातील ही लढाई अशीच पुढे चालू द्या, असे ठाकरे म्हणाले. पुढचा दौरा नांदेड जिल्ह्यात असेल तेव्हा किनवटला येईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.

साहेब आम्ही आजीवन तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाही शिवसैनिकांनीही उद्धव ठाकरेंना दिली. गद्दाराशी दोन हात करायला आम्ही सक्षम आहोत, तसे काही घडलेच तर तुमच्याशी संपर्क साधू, असे म्हणत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची कायम साथ देण्याचा शब्दही या काही मिनिटांच्या संवादात दिला. ठाकरे यांच्या पक्षाचे सहा खासदार शिंदेसेनेत गेल्यानंतर विशेषतः मराठवाड्यात याचे संतप्त पडसाद उमटले होते.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
IAS Pradeep Kumar: मोठी बातमी: 504 कोटींचा महाघोटाळा,'रिटायर्ड' होण्याच्या दिवशीच आयएएस अधिकाऱ्याची तुरुंगात रवानगी, प्रशासनात उडाली खळबळ

परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघात संतप्त शिवसैनिकांनी जाधव यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले होते. एवढेच नाही तर त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत आपला संताप व्यक्त केला होता.

ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशीवमध्ये, नागेश पाटील आष्टीकर यांच्या हिंगोली मतदारसंघातही काही ठिकाणी त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आज नांदेड जिल्ह्यातील महाशिबीराचे उद्घाटन आणि इतर कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी श्रीकांत शिंदे नांदेड दौऱ्यावर होते.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Mahua Moitra : मोठी बातमी! महुआ मोईत्रा यांच्यावर रेस्टॉरंटमध्ये अंडीफेक, बैठकीदरम्यान झाला जोरदार राडा; दोन तासांपासून हॉटेलमध्ये अडकल्या...

शिवसैनिकांना याची माहिती आधीपासूनच होती, त्यामुळे हिंगोली मतदारसंघातील सारखन आणि नांदेड जिल्ह्यातील माहुर तालुक्यातही श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला ठाकरेंच्या शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत फोडाफोडीच्या राजकारणावर संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाल्यानंतर फुटून गेलेल्या खासदार, आमदारांविरोधात मराठवाड्यात रोष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com