Andur ZP election : धाराशिवमध्ये काँग्रेसच्या माजी आमदारांसाठी कही खुशी कही मग : आलुरे गुरुजींचा पुतण्या पराभूत तर चव्हाणांच्या नातवाचा विजय

Political News : जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर विशेषतः जळकोट व मंगरूळ गटात ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला आहे.
BJP, Congress
BJP, CongressSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv news : धाराशिव जिल्हा परिषदेतील मतमोजणी सोमवार सकाळपासून सुरु झाली. तुळजापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे 9 गट आहेत. त्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर विशेषतः जळकोट व मंगरूळ गटात ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या तुळजापूर तालुक्यात तीन गटात भाजपला धक्कादायकरित्या पराभव सहन करावा लागला आहे. विशेषतः अणदूर जिल्हा परिषद गटातून शिक्षण महर्षी व माजी आमदार सि. ना. आलुरे गुरुजी यांचे पुतणे व भाजपचे उमेदवार दीपक आलुरे पराभूत झाले.

अणदूर जिल्हा परिषद गटातील निवडणूक ही हायहोल्टेज ठरली. दोन मावस भावातील लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. या गटात भाजपचे उमेदवार दीपक आलुरे यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार डॉ. जितेंद्र कानडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. विशेषतः गेल्या आठ वर्षांपासून आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासोबत असलेल्या दीपक आलुरे यांच्यासाठी हा पराभव जिव्हारी लागणार ठरला आहे. याठिकाणी क्रॉस व्होटिंगचा फटका भाजपच्या जिल्हा परिषद गटातील उमेदवार दीपक आलुरे यांना बसला आहे.

BJP, Congress
BJP Punjab strategy : पंजाबमध्ये काँग्रेसला खिंडार? बडा नेता पुन्हा भाजपच्या 'पिच'वर उतरणार? पत्नीच्या विधानांनी राजकारण तापले!

अणदूर पंचायत समिती गणातून माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांचे नातू व भाजप (BJP) नेते सुनील चव्हाण यांचे चिरंजीव रणवीर चव्हाण विजयी झाले आहेत. रणवीर चव्हाण यांनी पंचायत समितीच्या या निवडणुकीतून राजकारणात एंट्री केली आहे. त्यामुळे येत्या काळात पंचायत समितीच्या सभापती निवडीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

BJP, Congress
Shivsena Politics : "आमच्याकडे 237 आमदार, उगाचच धाडस..." उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच शिंदेंच्या शिलेदाराने डिवचलं

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर जळकोट येथील दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य असलेल्या प्रकाश चव्हाण यांच्या पत्नी ज्योती चव्हाण यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. याठिकाणी त्यांना काँग्रेसच्या प्रतीक्षा गोपाळ सुरवसे यांनी पराभूत केले.

BJP, Congress
Congress Politics : महापालिका, ZP च्या धामधुमीतच काँग्रेसचा महाराष्ट्रात नवा प्रयोग; सलगच्या पराभवांची मरगळ झटकून सुरु केली 2029 ची तयारी

त्यासोबतच मंगरूळ जिल्हा परिषद गटात काँग्रेसमधून ऐनवेळी भाजपमध्ये आलेल्या मुकूंद डोंगरे यांच्या नातेवाईक असलेल्या उमेदवाराला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. याठिकाणी समाजवादी पक्षाचे नेते देवानंद रोचकरी यांच्या कन्या विजयी झाल्या आहेत.

BJP, Congress
Pune ZP Election: पुणे झेडपीत कुणाची सत्ता? मतदारांची अजितदादांना साथ, NCP नंबरचा वन पक्ष? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com