Pankaja Munde News : राज्यभरात वाईट घटना घडतायेतं; बदनाम बीड होतयं!

Otherwise, Beed would not have been defamed : राजकीय भूमिका न घेता विषय संवेदनशील रितीने समजून घेतला असता तर बीड बदनाम झाले नसते. आमच्या जिल्ह्यात लोक स्वाभिमानी आहेत, मी महिला राजकारणी म्हणून तिथे काम करते.
Pankaja Munde News
Pankaja Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : पुणे, नागपूरसह राज्यात विविध ठिकाणी वाईट घटना घडतायेतं हे चित्र महाराष्ट्रासाठी चांगले नाही. बीडमधील घटनांबद्दल आता जे बोलतायेतं, ते दोन अडीच वर्ष गप्प का होते? त्यांच्यामुळेच बीड बदनाम होतयं, अशा शब्दात राज्याचा पर्यावरण (Pankaja Munde) मंत्री पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाराजी व्यक्त केली. सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात सर्वात पहिल्यांदा आपण एसआयटी चौकशीची मागणी केली होती, असेही त्या म्हणाल्या.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परळीत (Parli) अवादा पवनउर्जा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवा या मागणीसाठी मराठवाड्यासह राज्यभरात आक्रोश मोर्चे काढले जात आहेत.

Pankaja Munde News
Pankaja on Dhananjay Mude Resign : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंचे प्रथमच भाष्य; म्हणाल्या ‘धनंजयच्या राजीनाम्याचा....’

बीड आणि परळी जिल्ह्यात कसा गुंडाराज सुरू आहे, बीडचा बिहार होतोय का? असा सवाल सातत्याने केला जात आहे.या संपुर्ण विषयावर पंकजा मुंडे काय बोलतात? याकडेही संपुर्ण राज्याचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या खात्याची आढावा बैठक घेण्यासाठी पंकजा मुंडे आल्या होत्या. यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी राज्यभरात वाईट घटना घडत आहेत, मात्र बीड बदनाम होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली.

Pankaja Munde News
Dhananjay Munde : मुंडे एकाकी; पवारांवरील आरोपांनंतर पक्ष आक्रमक

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात आरोपींना मोक्का लावणार यावर मत विचारले असता मी यावर काय बोलू? मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय तर योग्यच आहे.तपसाबाबत आपण बोलणे योग्य नाही,असे पकंजा मुंडे म्हणाल्या. पुण्यात तरुणीला झालेल्या मारहाणीचा उल्लेख करत वाईट घटना घडली,हे सगळीकडे घडतंय अशा घटना राज्यात सगळीकडे घडत आहेत. कुठलीही घटना होते भांडण किंवा खून होतो त्यावर ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांच्यासाठी ही संधी आहे, असा टोलाही पंकजा मुंडे यांनी लगावला.

Pankaja Munde News
Santosh Deshmukh Murder Case : बीड पोलिस, 'CID', 'SID'कडून निसटला 'हा' गंभीर मुद्दा; राष्ट्रीय मानवाधिकार आयोग 'अ‍ॅक्शन मोड'वर

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भात विचारले असता, यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे, त्यावर मी कॉऊंटर करणार नाही.ते जर म्हणत आहे की शोध लागेपर्यं कारवाई करणा नाही, तर त्यावर मी रोज काय बोलू? धस यांच्या आरोपांबद्दल मला विचारले जाते, त्यावर मी काय बोलू? माझ्या बोलण्यामुळे राज्य हलले असते तर आता जे ते बोलताय ते पूर्वी का बोलले नाही? त्यांच्या मुळे बीड बदनाम झाले आहे.

Pankaja Munde News
Parli Kidnap Case News : परळीतील खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या अपहरण प्रकरणी पाच आरोपी ताब्यात!

राजकीय भूमिका न घेता विषय संवेदनशील रितीने समजून घेतला असता तर बीड बदनाम झाले नसते, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. आमच्या जिल्ह्यात लोक स्वाभिमानी आहेत, मी महिला राजकारणी म्हणून तिथे काम करते.सगळ्यात कष्टाचे जीवन असणारे लोक आमच्या जिल्ह्यातील आहेत. आम्ही काम करतो नाहीतर दरोडे करायला गेलो असतो ना, असेही पंकजा म्हणाल्या. माझ्याकडे नागपूर, पुण्यासह सर्व जिल्ह्यांची माहिती आहे, असे सांगत बीडला बदनाम केलं जात असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com