
Mumbai, 07 January : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि या राज्याचे सर्वोच्च नेतेच उत्तर देऊ शकतात. मी तर प्रोटोकॉलनुसार लहान आहे. राज्यातील कोणत्याही घटनेवर मी मागणी करणं योग्य नाही. मी मंत्री आहे, मला काही प्रोटोकॉल आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यावर त्यांचे वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील, असे सांगून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय यांच्या राजीनाम्यावर जादा बोलणं टाळलं.
बीड जिल्ह्यातील मस्सोजागचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या खून प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. राष्ट्रवादीसह भाजप आणि सर्वच पक्षातील आमदारांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना पंकजा मुंडे यांनी धनंजय यांच्या राजीनाम्यावर जादा बोलणं टाळले.
पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, माझ्या बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी आवश्यक त्या ठिकाणी मी व्यक्त झाले आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. याप्रकरणी कोणी कितीही मोठा असला तरी आम्ही त्याला सोडणार नाही, असे त्यांनी विधानसभेत सांगितले आहे. मुख्यमंत्री जेव्हा या प्रकरणीतील आरोपींना कडक शिक्षा करण्याचे सांगतात, तेव्हा त्या विषयाला मी नेहमी चालू ठेवते, तेव्हा माझा उद्देश सरळ स्पष्ट आहे, असे मला वाटत नाही.
आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर सकारत्मकता ठेवली पाहिजे. त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सांगूनही आपण विषय वाढवत असू तर ते अप्रत्यक्षपणे सरकारवरच प्रश्नचिन्ह लागते. गृहमंत्री या प्रकरणात कुचराई करतील, असे मला वाटत नाही. दररोज या विषयावर बोलावं, अशी माझी मानसिकता नाही. माझ्या मनात संवेदना आहेत. या प्रकरणाला धरून इश्यू करायचा, हा माझा स्वभाव नाही. एखाद्या प्रकरणातून काहीतर काढायचं, हा माझा हेतू नाही. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. तपासाच्या अंती सर्वकाही समोर येईल, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
खुनासारख्या संवदेनशील विषयात दररोज मीडियासमोर येऊन बोलणं योग्य नाही. मी एकदा एक भूमिका मांडली की दररोज त्याच भूमिकेला उगळत बसणे म्हणजे देशमुख कुटुंबीयांच्या दुःखाला उगळण्यासारखं आहे. देशमुख कुटुंबीयांच्या बाबतीत झालेल्या घटनेचा कुठेतरी आम्ही बाऊ करतोय आणि त्याला एक मंच तयार करून आम्ही आमचं व्यक्त होणाचं साधन करतोय, असं मला वाटतंय, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर टीकास्त्र सोडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.