Pankaja Munde Dasara Melava 2023 : आता मी मैदानात; भाजप नेतृत्वाला आव्हान देत पंकजा मुंडेंनीही ठोकला शड्डू

Pankaja Munde Bhaktigad Melava : समाजाचा सरकारकडून अपेक्षाभंग होत असून, आता समाज अपेक्षाभंग सहन करणार नाहीत
Pankaja Munde Dasara Melava 2023 :
Pankaja Munde Dasara Melava 2023 : Sarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : आता मी मैदानात, २०२४ पर्यंत. तुमची इच्छा असेल तर मला कोणीही घरी बसवू शकणार नाही. मी येणार आहे शिवशक्ती परिक्रमा केलेल्या नगर, जळगाव, नाशिक, सिन्नर, येवला आणि सिंदखेड राजाला जिजाऊंच्या दर्शनाला असे आश्वस्त करून राज्यात सर्वांना सोबत घेणारे, कुरवाळणारे नेतृत्व हवे आहे, असे म्हणत त्यांनी भाजप नेतृत्वावरही अप्रत्यक्ष टीका करत आपण मैदानात येत असल्याचे आव्हान दिले. त्रास देणाऱ्यांचे घर उन्हात बांधू, आता माझी माणसे उन्हात बसणार नाहीत, ते संयम दाखविणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

दसरा मेळाव्यातील भाषणात पंकजा मुंडेंनी जोरदार स्वपक्षावरही टीकास्त्र डागले. ऊसतोड मजुरांच्या मजुरीत वाढ दिल्याशिवाय तो फडात जाणार नाही, शेतकऱ्यांना द्यायला, मजुरांना द्यायला सरकारकडे काही नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे, ओबीसींच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.

Pankaja Munde Dasara Melava 2023 :
Pankaja Munde Dasara Melava : 'कारखान्यासाठी लोकांनी ११ कोटी जमवले, पण...'; पंकजा मुंडे काय म्हणाल्या ?

समाजाचा सरकारकडून अपेक्षाभंग होत असून, आता समाज अपेक्षाभंग सहन करणार नाही, असा इशाराही पंकजा मुंडे यांनी दिला. आपण पडलो मात्र थकलो नाही. तुमच्या सेवेत खंड पडला त्याबद्दल माफ करा, असे म्हणत प्रत्येकवेळी तुमचा अपेक्षाभंग झाला. (पंकजा मुंडेंना विधान परिषद किंवा राज्यसभेवर घेण्याबाबत) याबाबद्दलही माफी मागते. दरवेळी स्वप्न तुटले तरी तुमच्या नजरेत नवे स्वप्न निर्माण होते, अशा भावना त्यांनी या वेळी व्यक्त केल्या.

भ्रष्टाचारापासून देश वाचविला का, या त्यांच्या प्रश्नांचा रोख थेट पंतप्रधानांकडे होता. शंकर भोळा असला तरी त्याला तिसरा डोळा आहे. नियत बाजूला ठेवून राजकारण देशहिताचे नाही, असे नागपूरच्या दसरा मेळाव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाल्याचा दाखला देत जिंकण्यासाठी नितिमत्ता, निष्ठा गहाण ठेवू शकत नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pankaja Munde Dasara Melava 2023 :
Amol Mitkari News : आमदार अमोल मिटकरींनी ऐन वेळेवर बदलला रस्ता, काय आहे कारण ?

मंत्रिपद गेल्यावर फारसा विकास करता आला नाही

सरकारने १० वर्षांत गोपीनाथ मुंडेंचे स्मारक उभारले नाही, याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त करत आता स्मारक उभारू नका, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा, ऊसतोड मजुरांना न्याय द्या, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यातील ड्रगबाबत विषय छेडत दिवंगत मुंडेंनी अंडरवर्ल्डशी सामना करण्याचे धारिष्ट्य दाखविले, गोली का जवाब पोलिस गोलीसे देतील, असे आव्हान दिल्याची आठवण देत विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे अंगुलीनिर्देश केला.

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि ओबीसींच्या मनात भीती असताना राज्य सरकारकडून समाजाला खूप अपेक्षा आहेत. मी तुम्हाला देऊ शकते फक्त आणि फक्त स्वाभिमान. मी २०१९ पर्यंत सत्तेत होते. माझ्याकडे शेवटचं पद ग्रामविकास होते. त्या माध्यमातून गावागावांत विकासकामे मला करता आली. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत फारसे काही करता आले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Edited By- Anuradha Dhawade

Pankaja Munde Dasara Melava 2023 :
Vikhe Patil News: मंत्री विखेंच्या प्रश्नावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लपवली तोंडे !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com