Amol Mitkari News : कुणाचं काय तर कुणाचं काय? मिटकरी म्हणतात, 'महायुतीमुळे माझी 'ही' इच्छा अपूर्ण...'

Lok Sabha Election 2024 : "भविष्यात राजकीय समीकरणं कसे राहिल त्यावर सर्व अवलंबून आहे. शेवटी अजून बराच लांब पल्ला गाठायचा आहे," मिटकरींची प्रतिक्रिया...
Amol Mitkari News
Amol Mitkari NewsSarkarnama
Published on
Updated on

Akola News : महायुती आणि महाआघाडीत अशा दोन्ही बाजूला तीन-तीन प्रमुख पक्षांचे समीकरण असल्याने पक्षांना आपल्या काही जागा मित्रपक्षांना सोडाव्या लागल्या, तर काही नेत्यांना निवडणूक लढवायची आशाही सोडावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) विधानपरिषदेवरील आमदार अमोल मिटकरी यांनासुद्धा लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा होती, पण ती अपूर्णच राहिल्याचे मिटकरी म्हणाले. (Latest Marathi News)

Amol Mitkari News
Sharad Pawar NCP Manifesto 2024: गॅस 500 रुपयांपर्यंत करणार, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शपथनामा

लोकसभेच्या (Lok Sabha) दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी राज्यातील आठ मतदारसंघांत मतदान पार पडल्या. अकोला मतदारसंघातही निवडणूक पार पडली. या वेळी मतदान करायला अमोल मिटकरी मतदान केंद्रावर पोहाेचले होते. या वेळी प्रसार माध्यमांशी संवाद त्यांनी साधला. पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी आपली लोकसभा लढवण्याची इच्छा होती, असे कबूल केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amol Mitkari News
Uddhav Thacketay Manifesto : 'महाराष्ट्राला गतवैभव' मिळवून देणार; काय आहे ठाकरेंचा 'वचननामा'?

अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, "महायुतीसोबत गेल्यामुळे लोकसभा निवडणूक लढवायची माझी इच्छा नक्कीच अपूर्ण राहिली आहे. भविष्यात राजकीय समीकरण कसे राहिल त्यावर सर्व अवलंबून आहे. शेवटी अजून बराच लांब पल्ला गाठायचा आहे. निश्चितच लोकशाहीत प्रत्येकाला वाटतं की, आपण निवडणूक लढवली पाहिजे. तशी लोकसभा लढवायची माझीही इच्छा होती. ठीक आहे, या वेळी संधी मिळाली नाही, पुढच्या वेळी नक्की बघू. जनतेचा आशीर्वाद असेल तर नक्की निवडणूक लढवू," अशी खंत आणि भविष्याबाबत उमेदही आमदार मिटकरी यांनी व्यक्त केली.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com