MLC Election : निवडून येताच 'अदृश्य' होणाऱ्या विप्लव बजोरियांना महायुतीतूनच विरोध : विधानपरिषदेत अर्जुन खोतकरांच्या पुत्राची एन्ट्री होणार?

MLC Election : परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत विप्लव बजोरिया यांच्या उमेदवारीवर महायुतीत नाराजी वाढत आहे. अर्जुन खोतकर यांचे सुपुत्र अभिमन्यू खोतकर यांचे नाव पर्यायी उमेदवार म्हणून चर्चेत आले आहे.
Abhimanyu Khotkar, son of Shiv Sena MLA Arjun Khotkar, is emerging as a likely replacement for Viplav Bajoriya in the Parbhani-Hingoli MLC election.
Abhimanyu Khotkar, son of Shiv Sena MLA Arjun Khotkar, is emerging as a likely replacement for Viplav Bajoriya in the Parbhani-Hingoli MLC election.Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. महायुती-महाविकास आघाडीमध्ये कोणता पक्ष कोणता मतदारसंघ लढवणार? यावर जोरदार हालचाली आणि बैठकांचे सत्र सुरु आहे. यात परभणी-हिंगोली या जागेवर शिवसेनेकडून गतवेळचे आमदार विप्लव बाजोरिया पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्या उमेदवारीला संपूर्ण महायुतीतूनच विरोध असल्याचे दिसून येते.

परभणी-हिंगोली या जागेवर पांरपारिकपणे शिवसेनेचा दावा आहे. 2018 मध्ये या शिवसेनेकडून विप्लव बजोरिया हे निवडून गेले होते. मात्र परभणी-हिंगोली या दोनही जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांनी विप्लव बजोरिया यांच्या उमेदवारीला विरोध सुरू केला आहे. इथे आता नवे नाव समोर आले असून शिवसेनेचे नेते तथा जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांचे सुपूत्र अभिमन्यू खोतकर यांना परभणी-हिंगोलीमधून उमेदवारी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

6 वर्षांमध्ये मोठ्या नेत्यांचे दौरे किंवा शासकीय कार्यक्रम असे अपवाद वगळता विप्लव बजोरिया कधीही परभणी-हिंगोलीत फिरकले नाहीत. शिवाय बाहेरचा उमेदवार म्हणून बजोरिया यांना महायुतीतूनच विरोध होऊ लागला आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते यांनी विप्लव बजोरिया यांना दुसऱ्यांदा कामाला लागा, असे आदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बजोरिया पिता-पुत्रांनी नुकतीच उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन पाठिंब्याची विनंती केली होती.

परंतु आता शिवसेनेकडून तरुण चेहरा असलेल्या अभिमन्यू खोतकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. लवकरच या संदर्भात शिवसेनेचे व महायुतीतील इतर घटक पक्षांचे काही आमदार खोतकर यांच्याकडे उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह धरा, अशी मागणी करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला मिळावी, असाही सूर आहे. मात्र युतीमध्ये ही जागा शिवसेनेने लढवलेली असल्याने या पक्षाने आपला दावा कायम ठेवला आहे.

Abhimanyu Khotkar, son of Shiv Sena MLA Arjun Khotkar, is emerging as a likely replacement for Viplav Bajoriya in the Parbhani-Hingoli MLC election.
MLC Election : जळगावच्या जागेचा चेंडू किशोर पाटलांनी हळूच एकनाथ शिंदेंच्या कोर्टात टोलावला, मुलाच्या दावेदारीवर काय बोलले?

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर पारंपरिक आणि सध्याच्या परिस्थितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व आहे. 2018 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विप्लव गोपीकिशन बाजोरिया विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांचा पराभव केला होता. 2018 च्या निवडणुकीपूर्वी राज्य पातळीवरील तडजोडीत महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला सोडण्यात आली होती.

Abhimanyu Khotkar, son of Shiv Sena MLA Arjun Khotkar, is emerging as a likely replacement for Viplav Bajoriya in the Parbhani-Hingoli MLC election.
Nashik MLC Election : तर शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप भुजबळांच्या पसंतीचा उमेदवार देणार, नाशिकच्या रणधुमाळीतील पडद्याआडची गोष्ट

या जागेवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे वर्चस्व असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे संख्याबळ आहे. ही बदललेली राजकीय समीकरणे पाहता या मतदारसंघावरील वर्चस्वासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी चुरस वाढली आहे. महायुतीमधील शिवसेनेकडून विद्यमान आमदार विप्लव बाजोरिया यांचे नाव निश्चित मानले जात आहे. या शिवाय अल्पसंख्याक नेते सईद खान यांचेही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

दुसरीकडे भाजपाकडून ताकद वाढल्याचा दावा करत संतोष मुरकुटे, मिलिंद यंबल आणि आनंद भरोसे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून माजी आमदार विजय भांबळे आणि सुरेश नागरे इच्छुक आहेत. मात्र शिवसेना या जागेवरील दावा सोडण्यास तयार नसून विप्लव बजोरिया यांना विरोध करत नवा चेहरा मैदानात उतरवून धक्का देण्याच्या तयारीत स्थानिक नेते असल्याचे दिसते. येत्या दोन दिवसात याबाबतची घोषणा होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com