Loksabha Election 2024 : धुळ्यात काँग्रेसची मोठी खेळी; सुभाष भामरेंविरोधात डॉ. शोभा बच्छाव रिंगणात..?

Congress धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळाली असून त्यांच्याकडून अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही.
Subhash Bhamre, Dr. Shobha Bachhav
Subhash Bhamre, Dr. Shobha BachhavSarkarnama
Published on
Updated on

Dhule Loksabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने भाजपकडून डॉ. सुभाष भामरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटली आहे. काँग्रेसकडून या जागेवर अद्याप कुणालाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र आता या मतदारसंघासाठी माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांचे नाव चर्चेत आले आहे.

महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली आहे. मात्र अजूनही त्यांच्याविरोधात धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला तोडीस तोड उमेदवार मिळालेला नाही. याआधी काँग्रेसकडून धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर आणि डॉ. तुषार शेवाळे यांच्या नावांची चर्चा होती. आता मात्र, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांचे नाव पुढे आले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांच्या भारत जोडो न्याय यात्रेस धुळे जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला होता. याचा लाभ निवडणुकीत उठविण्यासाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर होऊन प्रचाराला सुरुवात होईल, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात काँग्रेसला अजूनही तोडीस तोड उमेदवार मिळालेला नाही. तर दुसरीकडे भाजप आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार या मतदारसंघासाठी जाहीर झाले आहेत.

Subhash Bhamre, Dr. Shobha Bachhav
Dhule Constituency 2024: 'सुभाष भामरेंचा पराभव फक्त मीच करू शकतो' तुषार शेवाळेंना भलताच कॉन्फिडन्स

धुळे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून त्यात नाशिक जिल्ह्यातील तीन मतदारसंघ आहेत. उमेदवारी देताना आतापर्यंत धुळे जिल्ह्यातीलच मतदारसंघांचा विचार करण्यात आला असला तरी या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघांचा विचार केल्यास तीन मतदारसंघांची साथ काँग्रेस उमेदवाराला मिळू शकेल, असा आशा व्यक्त केली जात आहे. म्हणून नाशिक जिल्ह्यातील डॉ. शोभा बच्छाव यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एमआयएमची मोठी ताकद

धुळे लोकसभा मतदारसंघात एमआयएमची मोठी ताकद आहे. त्यामुळे तेही या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध भाजप असा सामना होत होता. यावेळेस मात्र, मुस्लीम समाजाला एकत्र करून वेगळे राजकारण करण्यात एमआयएम लक्षवेधी ठरणार आहे. त्यामुळे धुळे मतदारसंघातून एमआयएमकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याची उत्सुकता आहे.

Edited By : Umesh Bambare

Subhash Bhamre, Dr. Shobha Bachhav
AIMIM-VBA News : इम्तियाज जलील यांच्यासाठी ओवैसी बडेभाई आंबेडकरांना साकडे घालणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com