Mahadev Jankar Vs Sanjay Jadhav : परभणीत असं काय घडलं की, एकमेकांविरोधात आग ओकणारे बंडू जाधव अन् जानकर आले एकत्र!

Parbhani Loksabha Election 2024 : परभणी लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी एकमेकांविरोधात दंड थोपटलेले महादेव जानकर- संजय जाधव एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
Mahadev Jankar, sanjay jadhav
Mahadev Jankar, sanjay jadhav Sarkarnama

Parbhani Political News : महाराष्ट्रातील मतदान संपल्यानंतर आता निकालाचे अंदाज बांधण्यास सुरुवात झाली आहे.तर दुसरीकडे मराठवाड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या पाचपैकी चार जागा डेंजर झोनमध्ये असल्याचेही बोलले जात आहे.यानंतर आता महायुतीच्या उमेदवारांची झोप उडालेली आहे.

अशातच छत्रपती संभाजीनगरचे शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांची घरी भेट घेतली होती.या भेटीनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या असतानाच आता परभणी लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रासपचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) हे देखील एका कार्यक्रमात एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Mahadev Jankar, sanjay jadhav
Malegaon City Politics : मालेगावमध्ये राहुल गांधींचे खटाखट.. खटाखट.. डॉ. भामरेंना बसवणार घरी?

यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राज्यभरातील चांगलीच चर्चेचा विषय ठरली. त्याचं कारण म्हणजे आरक्षणासाठीच्या मोठ्या लढ्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि मराठा समाजाचा नेमका फायदा आणि फटका कोणाला बसणार यावरुन तर्क - वितर्कांना उधाण आले आहे.

तसेच एकीकडे परभणीमध्ये ठाकरे आणि धनुष्यबाण असे परभणीकरांचे आजपर्यंतचे समीकरण राहिले आहे. त्याच जोरावर ठाकरेंचे शिलेदार बंडू जाधव (बॉस)हे या मतदारसंघातून हॅट्रिकवर आहेत. पण आता शिवसेनेत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. तर दुसरीकडे आधी शरद पवारांशी खलबतं करुन महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत असतानाच रासपच्या जानकरांनी महाविकास आघाडीलाच डच्चू दिला.त्यांनी महायुतीकडून परभणीची जागा देण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या सगळ्या घडामोडींनंतर परभणीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव आणि रासपचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या दोन्ही नेत्यांनी विजयासाठी दिवसरात्र मेहनत घेतली.जानकरांसाठी तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परभणीत सभा घेतली.यामुळे निश्चितच जानकरांना बळ मिळालं. तर दुसरीकडे जाधवांनीही आपल्या मतदारसंघातील अनुभवाचा पुरेपूर वापर करत प्रचारात जानकरांना तगडं आव्हान दिलं.

आरोप- प्रत्यारोपांनी या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. पण निवडणुकीचा प्रचार तोफा थंडावल्यानंतर मतदानही पार पडले आहे. यानंतर जाधव आणि जानकर या दोन्ही नेत्यांनी विजयाचा दावा ठोकला आहे.

Mahadev Jankar, sanjay jadhav
Amol Kirtikar News : बापासाठी लेक धावला, कारवाईची मागणी करणाऱ्या शिशिर शिंदेंना चांगलंच सुनावलं

परभणी लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी एकमेकांविरोधात दंड थोपटलेले महादेव जानकर- संजय जाधव (Sanjay Jadhav) एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.परभणीतील पोखरणी येथे पार पडलेल्या नरसिंह जन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात हे दोन्ही उमेदवार एकत्र आले होते.

विशेष म्हणजे दोन्ही नेते नरसिंह जन्मोत्सवाचे कीर्तन संपेपर्यंत एकमेकांसमोर बसून होते. मात्र,त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं. जन्मोत्सव झाल्यानंतर ते कार्यक्रम स्थळावरून पुन्हा बाहेर पडले.यावेळी दोन्ही नेते एकमेकांशी संवाद साधतील अशी अपेक्षा होती.पण त्यांनी बोलणं टाळल्यामुळे उपस्थितांचा मोठा हिरमोड झाला.

(Edited By Deepak Kulkarni)

Mahadev Jankar, sanjay jadhav
Milind Deora News: काँग्रेस का सोडली? चार महिन्यानंतर ठाकरेंकडे बोट दाखवत देवरांनी सांगितले कारण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com