Raosaheb Danve News : रावसाहेब दानवेंनी वाजवली 'शिट्टी', परभणीच्या प्रचारात 'बैलगाडा'

Parbhani Loksabha : रावासाहे दानवे बैलगाडी चालवत होते त्यावेळी त्यांच्या मागे महादेव जानकर उभे होते. महादेव जानकर यांचे चिन्ह शिट्टी आहे. दानवे शिट्टी वाजवत जानकर यांना विजयी करण्याचे आवाहन करत होते
Raosaheb Danve
Raosaheb Danvesarkarnama

Loksabha Election : परभणी लोकसभा मतदारसंघात रासपचे उमेदवार महादेव जानकर विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्यातील लढत अटीतटीची होताना दिसत आहे. जानकरांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. त्यानंतर रविवारी (ता.21) रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जानकरांच्या प्रचारासाठी परभणीतील सेलू येथे आले होते. प्रचारात आपल्या अनोख्या स्टाईलने रावसाहेब दानवेंनी मतदारांचे लक्ष्य वेधून घेतले.

Raosaheb Danve
Thane Lok Sabha Election : 'मुख्यमंत्री पुत्र मग तुम्ही घराणेशाहीचे प्रॉडक्ट नाही का?' श्रीकांत शिंदेंनी दिलं उत्तर...

डोळ्याला गॉगल...डोक्यावर गमजा...पांढरा सदरा आणि हातात बैलगाडीचा कासरा धरून शिट्टी वाजवत रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महादेव जानकर यांचा प्रचार केला. रावासाहे दानवे बैलगाडी चालवत होते त्यावेळी त्यांच्या मागे महादेव जानकर (Mahadev Jankar) उभे होते. महादेव जानकर यांचे चिन्ह शिट्टी आहे. दानवे शिट्टी वाजवत जानकर यांना विजयी करण्याचे आवाहन करत होते. तर पदाधिकारी, कार्यकर्ते देखील जानकर यांच्या आवाहनाला घोषणा देत प्रतिसाद देत होते.

परभणी मतदारसंघात महादेव जानकर यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा वाद सुरु झाला. जानकर यांनी आपण परभणीतच घर बांधून राहणार असल्याचे विरोधकांना उत्तर दिले होते. बंडूला इंग्रजी येत नाही. बंडू छोटा माणूस आहे, असे म्हणत संजय जाधव यांना डिवचले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा परिणाम परभणी मतदारसंघात झाला होता. निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असे मतविभाजण होण्याची शक्यता आहे. जानकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान यांनी प्रचारसभा घेतल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आता संजय जाधव यांच्यासाठी उद्धव ठाकरे हे प्रचारसभा घेणार आहेत त्याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raosaheb Danve
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांमुळेच नगरमधून काँग्रेस हद्दपार; शिंदे गटातील 'या' नेत्याचा गंभीर आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com