

Mayor Election News : परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही महौपार पद कोणत्या पक्षाला मिळणार? यावरून दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली. काँग्रेसने दोन्ही पदासाठी उमेदवार उतरवल्याने ठाकरेंच्या शिवसेनेची धडधड वाढली आहे. तर दुसरीकडे दोघांच्या भांडणात आपला काही लाभ होतो का? या संधीच्या शोधात भाजपाचे नेते आहेत. परंतु आता महापौर-उपमहापौर पदाची निवड लांबणीवर पडली आहे. आता 12 फेब्रुवारी रोजी या निवडीसाठी विशेष सभा होणार आहे.
पुर्वीच्या नियोजनानूसार 9 फेब्रुवारीला परभणीच्या महापौर, उपमहापौर पदासाठी प्रक्रिया पार पडणार होती. परंतु आता ती तीन दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयाने सगळ्याच राजकीय पक्षांना महापौर, उपमहापौर पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी काही अवधी मिळणार आहे. महापौर, उपमहापौरपदासाठी नऊ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार होती. या पदासाठी उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख तीन फेब्रुवारी होती. परंतु तत्पुर्वी अपवाद वगळता प्रमुख पक्षच या पदाचे उमेदवार निश्चित करु न शकल्याने प्रत्येक पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी आपआपल्या उमेदवाऱ्या दाखल केल्या होत्या.
महानगरपालिका निवडणूक आघाडीत कडून लढलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेसने 37 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजपाने 12, राष्ट्रवादीने 11 जागा जिंकल्या. तीन जागा जनसुराज्य शक्तीने जिंकल्या तर एक अपक्षाने. शिवसेना व काँग्रेस या पदाचे प्रबळ दावेदार असले तरी या पक्षांमध्ये या पदांसाठी एकमत होत नसल्याचे दिसून आले आहे.
ठाकरे सेनेने महापौरपदासाठी सहा तर उपमहापौर पदासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने दोन्ही पदासाठी प्रत्येकी तीन अर्ज दाखल केले. भाजपाने महापौरपदासाठी चार तर उपमहापौरपदासाठी दोन अर्ज दाखल केले तर राष्ट्रवादीने दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे.
जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणूकीत विविध पक्षांची नेतेमंडळी व्यस्त असल्यामुळे त्यांना आपल्या पक्षातील सदस्यांशी तसेच मित्र पक्षांशी संवाद साधण्यास वेळ मिळाला नव्हता. ठाकरे सेनेच्या महापौरपदाच्या उमेदवाराची निवड तर थेट मुंबईत होणार असल्याचे, तसेच काँग्रेस पक्षात देखील निवडीसाठी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
भाजपा ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे परंतु त्यांचा देखील उमेदवार अद्याप निश्चित नाही. ज्या प्रमाणे गटनेत्याचा विषय थेट प्रदेश पातळीवर गेला तसेच महापौर, उपमहापौर पदाच्या उमेदवाराचे नाव थेट वरुनच येणार असल्याचे समजते. जिल्हा परिषद निवडणूकीसाठी सात फेब्रुवारी रोजी मतदान व नऊ रोजी मतमोजणी असा बदल करण्यात आला होता. या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी महानगरपालिकेला पत्र पाठवले असून ही विशेष सभा आता 12 फेब्रुवारी रोजी नियोजीत वेळी व स्थळी घेण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
याच दिवशी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार व छाननी अंती वैध उमेदवारांची नावे वाचून दाखविल्यानंतर 15 मिनिटात लेखी नोटीस देवुन उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान घेणे आवश्यक असल्यास निवडणूक लढविणा-या उमेदवारांची नावे वर्णानुक्रमे घोषीत केले जाणार असून हात वर करून मतदान व मतांची नोंद घेण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.