Parbhani News: झेडपी अध्यक्षपदाचा मान मिळणार पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या मतदारसंघाला; लता वाकळेंची लागणार लॉटरी

Parbhani News: परभणी महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मित्रपक्ष शिवसेनेला सोबत घेत भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.
Meghana Bordikar_Lata Wakle
Meghana Bordikar_Lata Wakle
Published on
Updated on

ZP Election Result News: परभणी महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मित्रपक्ष शिवसेनेला सोबत घेत भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. तर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदाची लॉटरीही पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या जिंतूर मतदारसंघालाच लागण्याची शक्यता आहे. सावंगी म्हाळसा गटातून विजयी झालेल्या लता वाकळे या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

Meghana Bordikar_Lata Wakle
12 Zilla Parishad Results: ग्रामीण महाराष्ट्रातही महायुतीची 'घोडदौड'; अजित ‘दादां’च्या निधनानंतर राष्ट्रवादीला सहानुभूती

भाजपने 24 जागा जिंकून जिल्हा परिषदेवर सत्तास्थापनेकडे वाटचाल सुरू केली आहे. भाजप महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सोबत घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने जिंतूर तालुक्यालाच पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता असून, सावंगी म्हाळसा गटातून विजयी झालेल्या लता विजयकुमार वाकळे या अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार समजल्या जात आहेत.

Meghana Bordikar_Lata Wakle
इन्स्टास्टार राजकारणी निर्मला नवलेंच्या पराभवाची काय आहेत कारणं?

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत 54 पैकी 24 जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी त्यांना फक्त चार सदस्यांची गरज आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला बरोबर घेणार असल्याचे सूतोवाच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले असून, शिवसेनेचे पाच सदस्य निवडून आले आहेत. 15 जागा जिंकलेल्या व राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणार नसल्याचे बोर्डीकर यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

Meghana Bordikar_Lata Wakle
Latur ZP Election Result: लातूर झेडपीत काँग्रेसच मोठा पक्ष, पण...; भाजप 'असा' फिरवणार राजकीय खेळ

त्यामुळे भाजप व शिवसेना युतीची सत्ता जिल्हा परिषदेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतांना बहुतांशवेळा अध्यक्षपदे ही जिंतूर तालुक्याकडेच गेली आहेत. यापूर्वी काँग्रेसचे व अनुसूचित जमाती गटातून एकमेव सदस्य असलेले या तालुक्यातील सखाराम जवादे, राष्ट्रवादीच्या मीना बुधवंत, उज्ज्वला राठोड यांनी अध्यक्षपद भुषवले आहे.

Meghana Bordikar_Lata Wakle
Sharad Pawar: रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झालेल्या शरद पवारांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट! मुंबईत होणार पुढील उपचार? डॉक्टर नेमकं काय म्हणालेत?

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असून, भाजपचे तीन सदस्य या संवर्गात निवडून आले आहेत. त्यात जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा गटातून लता विजयकुमार वाकळे, पालम तालुक्यातील चाटोरी गटातून अमित घनदाट, पूर्णा तालुक्यातील चुडावा गटातून भरत घनदाट यांचा समावेश आहे. जिंतूर हा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा मतदारसंघ आहे. लता वाकळे यांचा थेट संपर्क असल्याने, जिल्हा परिषदेची सत्ता हातात ठेवण्यासाठी लता वाकळे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com