MLA Ratnakar Gutte: 'तर आमदारकीचा राजीनामा देईल' म्हणत रत्नाकर गुट्टेंचं विरोधकांना ओपन चॅलेंज; 'धनगर समाज माझ्या सोबत' असल्याचा दावा

Ratnakar Gutte, Mahesh Bidgar, Parbhani Politics: महेश बिडगर मारहाण प्रकरणात आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा करत आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दोषी आढळल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याचे आव्हान विरोधकांना दिले.
MLA Ratnakar Gutte
MLA Ratnakar GutteSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Politics: महेश बिडगर या धनगर समाजाच्या चळवळीतील तरुणाला ७ जुलै रोजी गंगाखेड शहरात बेदम मारहाण झाली होती. २१ जानेवारी रोजी मुंबईत निघालेल्या धनगर आरक्षण मोर्चातील एका व्हिडिओचा संदर्भ देत महेश बिडगर याने एका जातीचा अवमान केल्याचा आरोप करत त्याला पाच-सहा तरुणांनी पोलीस स्टेशन मधून बाहेर ओढत आणून बेदम मारहाण केली होती. जुन्या व्हिडिओतील 'माळरान' या शब्दाचा 'महार' असा चुकीचा अर्थ लावून दोन समाजात भांडण लावण्याचा हा प्रकार होता, असा आरोप करत धनगर समाजाने गंगाखेड शहरात मोठा मोर्चा काढला होता.

या वेळी विविध नेत्यांनी केलेल्या भाषणातून गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची महेश बिडगर मारहाण प्रकरणातील आरोपींना फूस होती, असा आरोप अप्रत्यक्षरित्या करण्यात आला. यावर गुट्टे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिले. तसेच बिडगर मारहाण प्रकरणात आपला सहभाग किंवा दोष आढळला तर आपण एका क्षणात आमदारकीचा राजीनामा देऊ, असे म्हणत विरोधकांना आव्हान दिले. मला धनगर समाजापासून वेगळं करण्याचा डाव काही लोकांनी आखला आहे, पण त्यात ते यशस्वी होणार नाही, असेही गुट्टे म्हणाले.

MLA Ratnakar Gutte
Maharashtra Political Live Update : अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकाचे सर्व प्रयत्न सुरू

धनगर समाजानेच आपल्याला आमदार केले, मग मी त्या समाजाच्या विरोधात कसा जाईल, आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने केले नाही इतके काम, सत्तेत प्रतिनिधित्व मी धनगर समाजाला दिले आहे, असे सांगत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदावर असलेल्यांची यादीच वाचून दाखवली. माझ्या विरोधात विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांनी समोरासमोर लढावे. जनतेसमोर जा, लोकशाही मार्गाने निवडणूक लढा आणि मला पराभूत करून दाखवा.

हिंमत असेल तर मैदानात या..

अशा प्रकारे गलिच्छ राजकारण मतदारसंघातील जनतेला अजिबात आवडलेले नाही, असेही गुट्टे म्हणाले. तुमचा मला विरोध असेल तर मा‍झ्या विरोधात मोर्चा काढून दाखवा, मग बघू तुमच्या मोर्चात किती लोकं येतात, अशा शब्दांत गुट्टे यांनी विरोधकांना सुनावले. तुम्हाला माझ्याशी लढायचे असेल, तर थेट मैदानात या पण दुसर्‍याच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण करू नका. या संपूर्ण प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही, असे स्पष्ट करतानाच महेश बिडगर याच्यावर दाखल करण्यात आलेला अनु सूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक गुन्हा रद्द करण्याची मागणीही गुट्टे यांनी केली.

या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा आणि सत्य जनतेसमोर यावे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणात मी दोषी आढळलो तर आमदारकीचा राजीनामा देईल. या प्रकरणाशी माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नाही. काही व्यक्ती माझे निकटवर्तीय आहेत, म्हणून मला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करू नका. माझे आणि पोले कुटुंबियांचे जवळचे संबंध आहेत. मात्र हा वाद गावस्तरीय आहे. त्याला जाणून बुजून जातीय आणि राजकीय रंग देण्यासाठी काही मंडळी मैदानात उतरली आहेत.

पण त्यातून त्यांचा डाव कधीही यशस्वी होणार नाही. कारण विधानसभा मतदारसंघासह अवघ्या जिल्ह्यातील धनगर समाज बांधव मा‍झ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तसेच मारहाण करणारे लोक माझे कार्यकर्ते नाहीत. मुळात हा गाव पातळीवरील स्थानिक वाद असून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहेत. घटनेच्या वेळी माझे नगरसेवक सुमित कामत घटना स्थळी उपस्थित होते. त्यांनी वाद वाढविण्याऐवजी तो सोडविण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष परिस्थिती आणि पसरवल्या जाणाऱ्या अफवा यामध्ये मोठा फरक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

MLA Ratnakar Gutte
Maharashtra Politics Live Update : रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये उद्या बंद

या प्रकरणातील खरे दोषी कोण आहेत? हे तपासातून समोर यावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. कोणत्याही दोषीला पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे गुट्टे यांनी स्पष्ट केले. काही राजकीय विरोधकांनी या घटनेचा वापर करून माझ्याविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. कारण विकासाच्या राजकारणात पराभूत झालेल्यांकडे मुद्दे उरले नाहीत. म्हणून अशा घटनांचा आधार घेतला जात आहे. महेश बिडगर आणि धनगर समाजाच्या नावाचा वापर करून काही जण स्वत:ची राजकीय पोळी भाजत आहेत. धनगर समाजाशी माझे संबंध कायम जिव्हाळ्याचे राहिले आहेत.

विविध स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था आणि महत्त्वाच्या पदांवर धनगर समाजातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचे काम मी केले आहे. त्यामुळे मी धनगर समाजाच्या विरोधात असल्याचा आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा त्यांनी केला. समाजाच्या प्रगतीसाठी केलेल्या कामांकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय आरोप करण्याची प्रवृत्ती दुर्दैवी आहे. शिवाय माझ्यासाठी प्रत्येक समाज समान आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये आणि प्रत्येक घटकाचा विकास व्हावा, हीच माझी भूमिका असल्याचे गुट्टे यांनी सांगीतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com