Ratnakar Gutte : यशवंत सेना-राष्ट्रवादीच्या सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश! रत्नाकर गुटेंच्या खेळीने पूर्ण्यात सभापतीपदाचा मार्ग मोकळा

Purna Panchayat Samiti politics : रत्नाकर गुट्टे यांच्या पुढाकाराने यशवंत सेना व राष्ट्रवादी सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यामुळे पूर्णा पंचायत समितीत भाजपचे संख्याबळ वाढून सभापतीपदाचा मार्ग सुकर झाला आहे.
MLA Ratnakar Gutte welcoming Yashwant Sena and NCP Panchayat Samiti members into BJP during a joining ceremony in Gangakhed, Parbhani district.
MLA Ratnakar Gutte welcoming Yashwant Sena and NCP Panchayat Samiti members into BJP during a joining ceremony in Gangakhed, Parbhani district.Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani Politics News : गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. नुकत्याच झालेल्या परभणी झेडपी निवडणुकीत भाजप पक्षाची सगळी सुत्रं त्यांच्या हाती गेली होती हे आता लपून राहिलेले नाही. भाजपने सगळे बी फाॅर्म गुट्टे यांना देऊन त्यांच्या समर्थकांना कमळ चिन्हावर निवडणुक लढवण्यास राजी केले होते. यावरून पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर टीकेची झोडही विरोधकांनी उडवली होती.

झेडपी निवडणुकीत पक्षाचे बी फाॅर्म आमदार गुट्टे यांच्या हवाली केल्यानंतर आता स्वतःच्या यशवंत सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचायत समिती सदस्यांचा भाजपमध्ये त्यांनी प्रवेश करून घेतला. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या यशवंत सेनेच्या दोन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याने आज भाजपमध्ये प्रवेश केला. या नाट्यमय घडामोडीमुळे भाजपचा सभापतीपदाचा मार्ग सुकर होणार आहे.

गंगाखेड येथे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यशवंत सेनेच्या तिकीटावर गौर गणातून निवडून आलेले नरेश उद्धवराव जोगदंड, धनगर टाकळी गणातून गोविंद सूर्यवंशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. देगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले विलास बळीराम गिरी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने पूर्णा पंचायत समितीतील सत्तेची समीकरण बदलली आहेत.

MLA Ratnakar Gutte welcoming Yashwant Sena and NCP Panchayat Samiti members into BJP during a joining ceremony in Gangakhed, Parbhani district.
Parbhani Mayor : प्रखर हिंदुत्ववादी शहरात महापौरपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं 'मुस्लीम' कार्ड : काँग्रेसकडून उपमहापौरपदावर 'हिंदू' चेहरा

भाजपाचे या निवडणुकीत 4 सदस्य निवडून आले होते. त्यामुळे आता भाजपचे संख्याबळ सातवर पोचले आहे. एकूण 12 सदस्य असलेल्या पंचायत समितीवर सभापती पदासाठी सातचा आकडा गाठणे आवश्यक होते. निवडून आल्यानंतर दोनच दिवसात आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, मित्र मंडळाचे तालुकाध्यक्ष सुभाषराव देसाई, तालुका प्रभारी नितीन उर्फ बंटी कदम यांनी हालचाली करत हा पक्षप्रवेश घडवून आणला.

MLA Ratnakar Gutte welcoming Yashwant Sena and NCP Panchayat Samiti members into BJP during a joining ceremony in Gangakhed, Parbhani district.
Parbhani ZP News: राजेश विटेकरांच्या भावाचा मताधिक्याचा 'रेकाॅर्ड'; पण अजित पवारांचं स्वप्न राहिलं अपूर्णच!

त्यामुळे पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकण्याचा मार्ग सुकर झाला. सभापतीपद नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे विलास गीरी हे सभापती पदी विराजमान होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com