Parbhani ZP Election: परभणी झेडपी निवडणुकीचं राजकारण पेटलं; मतदान केंद्राबाहेरच शिवसैनिकावर चाकू हल्ला

परभणी जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान पाथरी तालुक्यातील अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर शिवसेना कार्यकर्त्यावर चाकू हल्ला झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकास अटक केली आहे.
Police personnel outside a sensitive polling booth in Pathri taluka after a Shiv Sena worker was injured in a knife attack during Parbhani Zilla Parishad election voting.
Police personnel outside a sensitive polling booth in Pathri taluka after a Shiv Sena worker was injured in a knife attack during Parbhani Zilla Parishad election voting.Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani ZP Election News : परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदारांचा उत्साह दांडगा होता. सायंकाळपर्यंत 71 टक्के मतदान झाल्याचे बोलले जाते. काही ठिकाणी तुरळक वादावादीचे प्रकार घडले. तर पाथरी तालुक्यातील देवनांद्रा सर्कलच्या एका मतदान केंद्रावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर चाकू हल्ल्याचा प्रकारही घडला. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी दरम्यान देवनांद्रा सर्कलच्या ज्ञानेश्वरनगर येथील मतदान केंद्रावर काँग्रेस-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत वादविवाद व त्यानंतर हाणामारीची घटना सकाळी अकरा वाजता घडली.

यात एकावर चाकूने हल्ला झाला, गळ्यावर वार झाल्याने जखमीवर परभणी येथे उपचार सुरू असून पोलिसांनी गुन्हा नोंद करून एकास अटक केली आहे. देवनांद्रा ग्रामपंचायती अंतर्गत गुलशननगर, ज्ञानेश्वरनगर, सागर कॉलनी, विठ्ठलनगर भागातील मतदारांसाठी ज्ञानेश्वरनगर येथील जिल्हा परिषद (साकप) शाळेत मतदान केंद्र आहे. सकाळी अकरा वाजता शिवसेनेचे कार्यकर्ते अली अनवर अली अकबर अन्सारी हे मतदान केंद्राबाहेर उभे होते.

तिथे काँग्रेसचे कार्यकर्ते रोफखान जब्बार खान पठाण उर्फ गुलाब यांनी 'तू इकडे का आलास, तू शिवसेनेचे काम करतोस' म्हणत अनवर अन्सारी यांना मारहाण केली व तेथे असलेल्या एकावर चाकूने हल्ला केला. गळ्यावर वार केल्याने त्यांना परभणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेत पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Police personnel outside a sensitive polling booth in Pathri taluka after a Shiv Sena worker was injured in a knife attack during Parbhani Zilla Parishad election voting.
Parbhani Mayor : परभणी महापौर, उपमहापौरांची निवड लांबणीवर, आता 12 रोजी होणार महापालिकेची विशेष सभा!

2014 च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदान केंद्रावर हाणामारी व त्यानंतर पी.आर.शिंदे यांच्या घरावर हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यावेळी माजी आमदार बाबाजानी दुराणी, माजी नगराध्यक्ष तबरेज खान दुराणी, माजी नगराध्यक्ष जुनेद खान दुराणी, माजी नगरसेवक तारेख खान दुराणी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

Police personnel outside a sensitive polling booth in Pathri taluka after a Shiv Sena worker was injured in a knife attack during Parbhani Zilla Parishad election voting.
Parbhani ZP Election : परभणी झेडपीवर कोणाचा झेंडा? बोर्डीकर, जाधव, गुट्टे, वरपूडकर, दुर्राणींची प्रतिष्ठा पणाला!

केंद्र अतिसंवेदनशील

प्रत्येक निवडणुकीत या मतदान केंद्रावर हाणामारी व वादाच्या घटना घडत असल्याने जिल्हा परिषद (साकप) शाळा हे मतदान केंद्र अतिसंवेदनशील मतदान केंद्र म्हणून आयोगाने घोषित केला आहे. आज या मतदान केंद्रावर पोलिस असतांनाही दोन कार्यकर्त्यांत हाणामारीची घटना घडलीच.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com