Ambadas Danve On BJP: घोषणाबाज मोदी सरकारच्या नव्वद टक्के योजनाच जनतेला माहीत नाहीत..

Shivsena News : मोदी सरकारला सत्तेत येवून ९ वर्षे झाली पण अजूनही देशातील बहुतांश ग्रामीण भागात वीज पोहचलेली नाही.
Ambadas Danve On BJP News
Ambadas Danve On BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : केंद्र आणि राज्यातील सरकारविरोधात ठाकरे गटाने जोरदार मोहीम उघडली आहे. `शासन आपल्या दारी`, योजनेवर टीका केल्यानंतर जिल्ह्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ` होऊ द्या चर्चा` मोहिमेच्या माध्यमातून बोलघेवड्या सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. गंगापूर तालुक्यात आज `होऊ द्या चर्चा`, च्या माध्यमातून घोषणाबाज सरकारवर निशाणा साधला आहे.

Ambadas Danve On BJP News
Pankaja Munde in Maharashtra Sadan : एनडीएच्या बैठकीत पैठणीच्या फेट्यांचा थाट अन् नाशिक ढोलचा दणदणाट..

हे सरकार केवळ घोषणा करण्यात पटाईत आहे, प्रत्यक्षात मोदी सरकारच्या ७७८ पैकी तब्बल ७०० योजनांची माहीतीच जनतेला नसल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला. (Shivsena) २०१४ पासून केंद्र व राज्यात सत्तेत आलेल्या मोदी व भारतीय जनता पक्ष सरकारने लोकांच्या विकासासाठी एकूण ७७८ शासकीय योजना सुरू केल्या आहेत. (Marathwada) त्यापैकी ७०० योजना ग्रामीण भागातील शेतकरी व गरजवंताना माहीतच नाहीत.

या योजनांपैकी ०८ योजनांचा सुद्धा आम्हाला लाभ मिळाला नाही, अशा तक्रारी दानवे यांच्यासमोर ग्रामस्थांनी केल्या. हे सरकार फक्त अवास्तव घोषणा करत असुन प्रत्यक्षात कोणालाही या योजनांचा लाभ मिळाला नाही, हे या मोहीमेतून स्पष्ट झाले आहे. (BJP) त्यामुळे आगामी काळात हे वास्तव बदलण्यासाठी देशातील व राज्यातील शासन बदलण्याचा आम्ही पक्का निर्धार केला, असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

देशातील प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवण्याचे महत्वाकांक्षी ध्येय केंद्र सरकारने ठेवले होते. परंतु मोदी सरकारला सत्तेत येवून ९ वर्षे झाली पण अजूनही देशातील बहुतांश ग्रामीण भागात वीज पोहचलेली नाही.अशीच स्थिती `हर घर जल` योजनेची सुद्धा आहे. हजारो कोटी रुपये यावर खर्च केले जात आहेत. परंतु अजूनही यातून पाणी मिळाले नसल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.

सध्याचे सरकार जुलमी पद्धतीने शासन करत असून मोठा गाजावाजा करते. सूरू केलेल्या योजना या प्रत्यक्षात कमी आणि कागदावरच दिसत आहेत. बहुसंख्य लोकांपर्यंत या योजना पोहचतच नाहीत. अनेकांना तर त्या माहीतही नाहीत, त्यामुळे हे सरकार बोलघेवडेपणा करत असुन `शासन आपल्या दारी` असे विविध उपक्रम राबवत आहे. असे असले तरी याचा लाभ कुणालाही मिळत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com