Nagpur News : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या ओबीसी समाजातून मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्याची मागणी केल्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. ओबीसी समाजाने जरांगेंच्या मागणीला तीव्र विरोध दर्शवला आहे. तर जरांगेंही इरेला पेटले असून आता आरक्षणाशिवाय माघार घेणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे.
याचवेळी ओबीसींच्या जालना जिल्ह्यातील अंबड येथे झालेल्या मेळाव्यात तर मंत्री छगन भुजबळांनी अक्षरश:जरांगे पाटलांवर तिखट वार केले.एकीकडे भुजबळ- जरांगे पाटील वाद पेटलेला असतानाच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी भुजबळांना डिवचलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जालना येथील मंत्री छगन भुजबळांच्या भाषणावरुन अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.त्यांनी या पोस्टमधून खळबळजनक दावा केला आहे. त्यात देवेंद्र फडणवीसांनीच (Devendra Fadnavis) छगन भुजबळांना मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात उभं केलं आहे असे विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
अंजली दमानिया यांनी ट्विट करत छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, कुठेतरी असे वाटते की, भुजबळांना फडणवीसांनी जरांगेंना विरोध करण्यासाठी उभं केलं आहे.आता तावातावाने भुजबळ कसे बोलतात पाहा …आता छातीत कळ नाही येत ? जेलमधून बाहेर येण्यासाठी अगदी गरीब बिचारे बनण्याचा आव आणायचे, असं दमानियांनी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
जालनाच्या अंबड तालुक्यात ओबीसी नेत्यांची मोठी सभा आयोजित करण्यात आली. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी भाषण केलं. छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात मराठा नेते मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली.
ते म्हणाले, आमची लेकरंबाळं, आमची लेकरंबाळं… मग बाकीच्यांची लेकरंबाळं नाहीत का रे बाबा… भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला तुरुंगात, हो आलो. अरे छगन भुजबळ दिवाळीतही बेसन भाकर आणि कांदा फोडून खातो. पण स्व कष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, असा घणाघात छगन भुजबळांनी केला.
छगन भुजबळ म्हणाले,लाठीचार्ज झाल्यानंतर हे शूर सरदार घरात जाऊन झोपले. यांना अंबडचे आमचे मित्र टोपेसाहेब, दुसरे आमचे मित्र रोहित पवार हे त्यांना घरातून रात्री तीन वाजता घेऊन आले.म्हणाले, बस तिकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येणार आहेत.पण यांनी शरद पवारांना हे नाही सांगितलं की,लाठीचार्ज का झाला? शरद पवारांना आम्ही आजही उत्कृष्ट प्रशासक समजतो असंही भुजबळ म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.