Narendra Modi appeal : पंतप्रधान मोदीचं देशवासियांना काटकसरीच आवाहन; ठाकरेंचा नेता म्हणाला, आपण किती सक्षम हे सांगा!

fuel crisis India News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने टीका करताना वस्तुस्थिती देशासमोर मांडा, असे आवाहन करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Narendra Modi, Uddhav thackeray
Narendra Modi, Uddhav thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : आखाती देशातील युद्धामुळे निर्माण झालेला इंधन तुटवडा पाहता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसर करण्याचे आवाहन केले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, सोन खरेदी, विदेशी प्रवास करू नका यासह अनेक गोष्टींचा अवलंब करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने टीका करताना वस्तुस्थिती देशासमोर मांडा, असे आवाहन करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

विधान परिषदेतील आमदार तथा शिवसेनेचे (Shivsena) नेते अंबादास दानवे यांनी मोदींच्या आवाहनानंतर सोशल मिडियावर प्रतिक्रिया दिली आहे. पाच राज्यांच्या निवडणुका आटोपल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून 'काटकसर' करण्याचे आवाहन केले. यापूर्वीही अनेकवेळा देश संकटाच्या काळात एकसंघपणे उभा राहिला आहे, याची अनेक उदाहरणे आहेत.


Narendra Modi, Uddhav thackeray
Maharashtra Political updates : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

मात्र, कालचे भाषण पाहता, खालील प्रश्नांची उत्तरे सरकारने देशासमोर अगदी कागदावर मांडायला हवीत, असे मत दानवे यांनी व्यक्त केले. यात प्रामुख्याने देश संकटात आहे, तर या संकटाचे नेमके स्वरूप काय आणि ते किती गंभीर आहे?, हे आकड्यांच्या आधारे स्पष्ट करावे. देशाला दररोज किती इंधन लागते आणि त्याचा वापर नेमका किती टक्क्यांनी खाली आणण्याचे उद्दिष्ट आहे? हे ही सांगावे.


Narendra Modi, Uddhav thackeray
Maharashtra Politics Live Update : बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

'सोने खरेदी टाळा' असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे; मात्र खाणींपासून ते सोन्याच्या दुकानांपर्यंत काम करणाऱ्या कामगारांची साखळी आणि त्यांचे उपजीविकेचे साधन वाचवण्यासाठी सरकारने काय योजना आखली आहे? याचा खुलासा होणेही गरजेचे आहे. सध्या देशभरात शेतीची कामे वेगाने सुरू आहेत. अशा वेळी शेतीसाठी लागणाऱ्या इंधनावरही सरकार काही निर्बंध लावणार नाही ना? याबाबतही स्पष्टता होणे गरजेचे आहे.


Narendra Modi, Uddhav thackeray
Maharashtra Politics Live Update : बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

'वर्क फ्रॉम होम' कार्यालयांसाठी योग्य असले, तरी 15 दिवसांनी सुरू होणाऱ्या शाळांचे काय? विद्यार्थ्यांनी शाळेत कसे जायचे आणि त्यांच्या प्रवासाचे नियोजन काय असेल? रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक खतांकडे वळणे ही चांगली बाब आहे, पण देशाला लागेल तितक्या मोठ्या प्रमाणात नैसर्गिक खतांची निर्मिती करण्यास आपण सध्या सक्षम आहोत का? अशी प्रश्नांची सरबत्ती पंतप्रधानांच्या आवाहनानंतर करण्यात आली आहे.


Narendra Modi, Uddhav thackeray
Maharashtra Politics Update : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com