Narendra Modi Beed Sabha : PM मोदी बीडला येणार होते रेल्वेत; पण 161 किलोमीटरचा लोहमार्गच अपूर्ण!

Loksabha Election 2024: दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या लोहमार्गाच्या कामासाठी राज्याचा 50 टक्के व केंद्राचा 50 टक्के वाटा असा देशातला पहिला ऐतिहासिक निर्णय घेतला.
Narendra Modi Sabha For Pankaja Munde
Narendra Modi Sabha For Pankaja MundeSarkarnama

Beed Political News : खुद्द नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर बीडला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जिल्हावासीयांचे व दिवंगत गोपीनाथराव मुंडेंचे (Gopinath Munde) रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन भरसभेत दिले.

मात्र, त्यांनी रेल्वेत बसून येण्यासाठी आणखी मोठी वाट पाहावी लागणार आहे. 261 किलोमीटर अंतराच्या नगर - बीड - परळी या लोहमार्गापैकी केवळ 100 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून 161किमी अंतराचे काम अपूर्ण आहे.

सध्या अहमदनगर ते अंमळनेर (ता. पाटोदा) पर्यंतचे काम पूर्ण झाले असून, इथपर्यंत रेल्वे धावत आहे. दररोज केवळ एकच फेरी होत आहे. आता अंमळनेर ते बीड व बीड ते परळीपर्यंत रेल्वे कधी धावणार आणि मोदी या रेल्वेत कधी बसून येणार याकडे बीडकरांच्या नजरा लागल्या आहेत. मध्य रेल्वेच्या वेबसाइटवर 2026 पर्यंत या लोहमार्गाचे काम होईल, असे नमूद करण्यात आले आहे. (Beed Loksabha Election 2024)

Narendra Modi Sabha For Pankaja Munde
Loksabha Election : PM मोदी-उद्धव ठाकरेंचे एकमेकांविषयी प्रेम, बघा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

अहमदनगर - बीड - परळी लोहमार्गाचा अनेक वर्षांपासूनचा मुद्दा आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या लोहमार्गाच्या कामासाठी राज्याचा 50 टक्के व केंद्राचा 50 टक्के वाटा असा देशातला पहिला ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर राज्य सरकार व केंद्र सरकारच्या निधी उपलब्धतेवरून कायम एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे.

परिणामी या लोहमार्गाचे काम संथगतीने झाले. परिणामी दहा वर्षांपूर्वी खुद्द पंतप्रधानांनी आश्वासन दिलेला जिल्हावासीयांच्या जिव्हाळ्याचा लोहमार्ग 261 किलोमिटर अंतरापैकी केवळ 100 किलोमिटर पूर्ण झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 मध्ये रेल्वेत बसायचे स्वप्न बीडवासीयांना दाखविले गेले. पण, 2024 च्या निवडणुकीतही मोदींना रेल्वेत बसून येता येणार नाही. दरम्यान, मंगळवारी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची अंबाजोगाईत सभा होणार आहे. सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (ChandraShekhar Bawankule) आदींची उपस्थिती असेल.

(Edited By Deepak Kulkarni)

Narendra Modi Sabha For Pankaja Munde
Solapur Lok Sabha : खबरदार...! मतदान करतानाचे फोटो/व्हिडिओ व्हायरल कराल, तर गुन्हा दाखल होणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com