Rajesh Vitekar: परभणीत दिवाळीनंतर राजकीय फटाके! राजेश विटेकररांच्या खेळीने सईद खान यांच्या सत्तेला आव्हान

Parbhani Politics : दिवाळीनंतर परभणीच्या राजकीय क्षेत्रात फटाके वाजण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांच्या खेळीने शिवसेना शिंदे गटाचे आमदार सईद खान यांच्या पाथरी नगर परिषदेतील सत्तेला थेट आव्हान दिले आहे.
Parbhani Hingoli MLC Election; Rajesh Vitekar, MLC Saeed Khan and Eknath Shinde
Parbhani Hingoli MLC Election; Rajesh Vitekar, MLC Saeed Khan and Eknath Shindesarkarnama
Published on: 
Updated on: 

Parbhani politics : दिवाळीनंतर परभणीच्या राजकीय क्षेत्रात फटाके वाजण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांच्या खेळीने शिवसेना शिंदे गटाचे आमदार सईद खान यांच्या पाथरी नगर परिषदेतील सत्तेला थेट आव्हान दिले आहे. 12 नोव्हेंबर रोजी पाथरी नगर परिषदेतील शिवसेना शिंदे गटाचे सदस्य हासिब खान व आलम तरन्नुम बेगम मुजीब यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत नगरपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे राजीनामा दिल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार विटेकर हे उपस्थित होते.

संख्याबळ घटले

पाथरी नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली एकूण बारा सदस्य निवडून आले. शिवसेना शिंदे गटाचे आमदार सईद खान यांच्या नेतृत्वाखाली नगर अध्यक्षपदी आसिफ खान हे विजयी झाले तर नऊ सदस्य निवडून आले या नऊ पैकी दोन जणांनी राजीनामा दिल्याने शिवसेना शिंदे गटाचे संख्याबळ नऊवरून सातवर आले आहे. यामुळं विरोधी बाकावरील सदस्य संख्या 14 वर पोचली आहे.

Parbhani Hingoli MLC Election; Rajesh Vitekar, MLC Saeed Khan and Eknath Shinde
UP Election 2027: युपीत नवं सत्तासमीकरण! चंद्रशेखर आझाद मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; भाजप, सपामध्ये खळबळ

विटेकर, खान जुनाच संघर्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर व शिवसेनेचे आमदार शेख खान यांच्यातील राजकीय संघर्ष जुनाच आहे. पाथरी विधानसभा निवडणुकीत पासून हा संघर्ष सुरू झालेला आहे. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीकडून सईद खान यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र विटेकर यांच्या समर्थकांनी सईद खान यांच्या विरुद्ध प्रचार केल्याचा आरोप सईद खान यांच्याकडून केला जातो.

तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतही सईद खान यांना विटेकर यांच्या गटाकडून विरोध होता असेही बोलले जाते. या पार्श्वभूमीवर आमदार विटेकर यांनी शिवसेनेचे दोन नपा सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देऊन सईद खान यांच्या सत्तेला आव्हान दिले आहे.

Parbhani Hingoli MLC Election; Rajesh Vitekar, MLC Saeed Khan and Eknath Shinde
Nitin Gadkari: "आम्हा सगळ्यांच्या मनात एक खंत आहे", कोल्हापूरच्या दूध उत्पादनावर नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले? डेअरीच्या विकासावरही केलं भाष्य

पाथरी नगर परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. नगरपरिषदेत मनमानी व भ्रष्ट कारभार चालू आहे याला कंटाळून शिंदे गटाच्या नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत व ते भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असणार आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत हे दोन्ही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील, असा दावा आमदार राजेश विटेकर यांनी केला आहे.

तर आमदार राजेश विटेकर हे नेहमीच महायुतीच्या सोबत न राहता काँग्रेस पक्षाचे नेत्यांसोबत असतात. विधानपरिषद निवडणूक, नगरपरिषद सोनपेठ येथील निवडणूक व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मला प्रचंड विरोध झाला तरी मी विजयी झालो.दोन सदस्य गेले म्हणून मला फरक पडत नाही भविष्यात याचे उत्तर नक्कीच देईन, असा इशारा आमदार सईद खान यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.