Beed: कोट्यावधींच्या वाळूवर डल्ला मारणारा बीड जिल्ह्यातील तहसीलदार अडचणीत; जिल्हाधिकाऱ्यांनी आवळला कारवाईचा फास

Beed Sand Scam, Georai Tahsildar, Housing Scheme Sand: बीडच्या गेवराईतील घरकुल लाभार्थ्यांच्या वाळू घोटाळ्यात तहसीलदारांसह महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता असून चौकशीत गंभीर अनियमितता उघड झाल्या आहेत.
Sand Mafiya.
Sand Mafiya.File Photo
Published on
Updated on

Beed Politics: गेवराईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विजयसिंह पंडीत यांनी तालुक्यासह बीड जिल्ह्यातील वाळू माफियांविरुद्ध दंड थोपटले आहेत. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या वाळूवर डल्ला मारणाऱ्यांच्या टोळीचा पर्दाफाश करताना पंडीत यांनी थेट गेवराईचे तहसीलदार यांच्यावरच गंभीर आरोप केले होते. कोट्यावधी रुपयांची घरकुलासाठी दिलेली वाळू तहसीलदारांच्या आशिर्वादाने वाळु माफिया आणि महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ब्लॅकमध्ये विकल्याचे पुरावे आणि लेखी तक्रार पंडीत यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

यावर चौकशी समिती नेमल्यानंतर अनेक घरकुल लाभार्थी पुढे आले असून आपल्याकडून ओटीपी घेऊन गेल्यानंतर वाळू मात्र मिळाली नसल्याचे लेखी खुलासे त्यांनी दिल्याची माहिती आहे. यानंतर जिल्हाधिकारी व प्रशासनाने गेवराईचे तहसीदार यांच्यासह तलाठी, महसूल विभागाचे काही अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती आहे.

Sand Mafiya.
Sand Scam : आमदार विजयसिंह पंडीत यांच्या आरोपानंतर गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे अडचणीत; आता वाळू घोटाळा अधिवेशनात गाजणार!

बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील वाळू घोटाळा प्रकरणात प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. गरीब घरकुल लाभार्थ्यांच्या नावाचा गैरवापर करून गोदावरी नदीपात्रातून कोट्यवधी रुपयांची अवैध वाळू उपसा केल्याचे हे प्रकरण खुद्द आमदार विजयसिंह पंडीत यांनीच समोर आणले होते. या विषयावर आगामी पावसाठी विधिमंडळ अधिवेशनात आपण आवाज उठवणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला होता. जिल्हाधिकारी जाॅन्सन यांनी पंडीत यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत वेगवान तपास सुरू केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनावणीनंतर महसूल विभागात खळबळ उडाली असून गेवराईच्या तहसीलदारांसह एकूण ३८ जणांची पाच तास कसून चौकशी व सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीनंतर संबंधित तलाठी, कंत्राटी कर्मचारी आणि १५ वाळू दलालांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Sand Mafiya.
Government Land Scam : बनावट सही-शिक्क्यांचा खेळ ; सरकारी जमीन लाटणाऱ्या 7 ग्रामसेवक, 8 सरपंच व 40 भूमाफियांवर कारवाईचे आदेश

दरम्यान, प्रशासनाने केलेल्या प्रत्यक्ष सर्वेक्षणात घरकुल योजनेतील अडीचशे लाभार्थ्यांचे जबाब नोंदवण्यात आले. यात बहुतेक लाभार्थ्यांनी, कागदावर आमचे नाव असले, तरी आम्हाला प्रत्यक्ष एक ब्रासही वाळू मिळाली नाही, असा खुलासा केला आहे. कागदोपत्री वाळू वितरित झाल्याचे दाखवून प्रत्यक्षात ती काळ्या बाजारात विकून कोट्यवधींचा डल्ला मारण्यात आल्याचे या तफावतीवरून स्पष्ट झाले आहे.

तहसीलदारांचे निलंबन अटळ

या घोटाळ्यात महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि स्वतः गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे हे अडकले आहेत. त्यांच्यावर कोणत्याही क्षणी निलंबनाची कारवाई होऊ शकते, असे बोलले जाते. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवला जाणार आहे. या गैरव्यवहारात कोणताही दोषी सुटणार नाही, प्रत्येकावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com