ZP News : झेडपी सीईओच्या बंगल्यात 25 लाखांचे बोगस काम दाखवून बील लाटले; आणखी 23 कामे संशयाच्या फेऱ्यात, कोट्यावधींचा घोळ उघडकीस येणार!

Prashant Bamb News : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत गेल्या अडीच-तीन वर्षाच्या प्रशासक राजच्या काळात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी नुकत्याच झेडपी भेटीत केला होता.
Chhatrapati Sambhajinagar ZP President Reservation News
Chhatrapati Sambhajinagar ZP Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत गेल्या अडीच-तीन वर्षाच्या प्रशासक राजच्या काळात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी नुकत्याच झेडपी भेटीत केला होता. तत्कालीन सीईओ मीना यांचे थेट नाव घेत बंब यांनी जलजीवन मिशन योजनेतील आपल्याच मतदारसंघातील दोन सर्कलमधील प्रकार समोर आणला होता. याशिवाय अनेक गैरप्रकार, भ्रष्टाचार झाल्याचा आणि त्याचे पुरावे देणार असल्याचे सांगितले होते.

प्रशांत बंब (Prashant bamb) यांच्या झेडपीतील भेटीनंतर प्रशासक राजमधील आणखी एक कागदोपत्री काम दाखवून 25 लाखांची बीले उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. सीईओच्या बंगल्यावर लाईट फिटिंग व इतर दुरुस्तीची कामे केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. त्याची बोगस बीले सादर करून रक्कम लाटण्यात आली, असा आरोप आणि लेखी तक्रार माजी बांधकाम सभापती संतोष जाधव आणि जिल्हा परिषद सदस्य सविता जाधव यांनी केली होती.

Chhatrapati Sambhajinagar ZP President Reservation News
Maharashtra Politics Update: दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

या तक्रारीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या सरकारी बंगल्यावर लाईटींगची कामे केल्याचे केवळ कागदोपत्री दाखवून 25 लाख रुपयांची बिले लुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा एक प्रकार समोर आला असला तरी प्रशासकाच्या काळात झेडपीच्या बांधकाम विभागामध्ये झालेली आणखी 23 कामे संशयास्पद आहेत. यातून झालेल्या गैरप्रकाराचा आकडा हा तब्बल बारा कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Chhatrapati Sambhajinagar ZP President Reservation News
Maharashtra Politics Live Update : मोहोळचे आमदार राजू खरे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना पाठिंबा

या तक्रारीची दखल घेत विभागीय अपर आयुक्त सुषमा देसाई यांनी चौकशी समिती स्थापन करून दोषींवर कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. कागदोपत्री सीईओंच्या बंगल्यावर लाईटींग व इतर फिटींगची कामे केल्याचे दाखवून 25 लाखांचे बील उचलणाऱ्यांनी सीईओ यांच्या बंगल्यावर जाऊन कोण तपासणार? असा विचार करून दुरुस्ती आणि लायटिंगची कामे दाखवून बिले उचलली.

Chhatrapati Sambhajinagar ZP President Reservation News
Maharashtra Political Update : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

गरज नसताना 25 लाखांच्या कामासाठी 7 एप्रिलला बांधकाम विभागाकडून कामाचे आदेश दिले गेले. कामे न करता महिनाभरात म्हणजे 4 मे रोजी 25 लाख रुपयांच्या बिलांचे पैसेही कंत्राटदाराला दिले गेले. विशेष म्हणजे 2 एप्रिल 2026 रोजी मिन्नू पी. एम. या CEO म्हणून रुजू झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसातच कामाचे आदेश दिले गेले. अशाच पद्धतीने प्रशासकाच्या काळामध्ये बांधकाम विभागामध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाल्याची सध्या चर्चा आहे, त्याबाबत चौकशी करण्याची मागणीही संतोष जाधव यांनी केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar ZP President Reservation News
Maharashtra Political Update : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

या प्रकरणावर सध्या चौकशी समिती नेमण्यात आली असून त्यांच्या अहवालानुसार कारवाई केली जाईल, असे ॲडिशनल सीईओ वासुदेव सोळंके यांनी सांगितले आहे. अपर आयुक्त सुषमा देसाई यांनी छत्रपती संभाजीनगरच्या सीईओ मिन्नू यांना पाठवलेल्या पत्रात जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या 'नमुना नं 48' या कंत्राटाची नोंदवहीत बोगस कायारंभ आदेश देऊन, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती या लेखा संहिता 1968 या नयमातील कलम 147 मधील असलेल्या बाबींमध्ये अनियमितता करून बोगस कार्यारंभ आदेशाबाबत झालेल्या भ्रष्टाचारा बाबतचे निवदेन जि. प. सदस्य सविता जाधव यांनी दिल्याचे म्हटले आहे.

निवेदनकर्त्यांकडे असलेले पुरावे घेऊन, निवेदनात नमूद सर्व मुद्यांची जिल्हास्तरीय चौकशी समितीमार्फत चौकशी करावी व चौकशीत दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यावर नियमानूसार शासकीय कार्यवाही करून तसे संबंधिताना कळवावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar ZP President Reservation News
Maharashtra Politics Update : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com