Pratap Sarnaik : माझ्याशी हिंदीत नाही तर मराठीतच बोला; आयएएस अधिकाऱ्यांना सरनाईकांनी ठणकावले

Marathi language controversy News : माझ्याशी बोलताना हिंदीत नाही तर मराठीतच बोला, असे भर कार्यक्रमातच परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आयएएस अधिकाऱ्यांना बजावले.
Pratap Sarnaik News Dharashiv
Pratap Sarnaik News DharashivSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv news : माझ्याशी बोलताना हिंदीत नाही तर मराठीतच बोला, असे भर कार्यक्रमातच परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आयएएस अधिकाऱ्यांना बजावले. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी मैनिक घोष हे हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे या दोघांना यापुढे हिंदीत बोलणार असाल तर मी बोलणार नाही. महाराष्ट्र केडर घेऊन जर नोकरी करीत असाल तर राज्यात मराठीत बोलायचे, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांच्या उपस्थित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री सरनाईक यांनी एका कार्यक्रमप्रसंगी बोलताना आयएएस अधिकाऱ्यांनी मराठीतच बोलले पाहिजे, असा आग्रह धरला आहे.

Pratap Sarnaik News Dharashiv
Shivsena Politic's : उद्धव ठाकरे अन्‌ एकनाथ शिंदेंच्या एकत्र येण्याबाबत शिवसेना मंत्र्याचे मोठे विधान; म्हणाले ‘ते दोघेही मिठ्या मारतील...’

आताच मी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी मैनिक घोष यांना सांगितले आहे की, माझ्याशी बोलताना हिंदीत नाही तर मराठीतच बोला. मुंबईला मराठी, हिंदी काय वाद व्हायचा आहे तो होऊ द्या. परंतु आपल्या आयएएस अधिकाऱ्यांनी जर महाराष्ट्र केडर घेतले असेल तर मराठीतच बोलायला हवे. त्यामुळे आपला फायदा होणार नाही, तर त्यांचा फायदा होणार असल्याचे देखील सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Pratap Sarnaik News Dharashiv
Uddhav Thackeray interview : "चर्चा होईल, पण..."; राज ठाकरेंसोबत युती होणार का? राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, याच वेळी त्यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील काही आरोपीना अटक करण्यात आली नसल्याने पालकमंत्री सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीना तात्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या असून त्यासाठी त्यांनी आता पोलीस यंत्रणेला 15 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.

Pratap Sarnaik News Dharashiv
Uddhav Thackeray : "कदाचित मोदींना पर्याय ठरल्यानंतरच मोहन भागवत बोलले..."; उद्धव ठाकरेंनी सांगितली संघाची 'मन की बात'

दरम्यान, कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यास प्रशासनाकडून दिरंगाई केली जात असून जात वैधता प्रमाणपत्र देण्यास विभागातील अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या मराठी आंदोलकांनी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेराव घातला. आमची अडवणूक केली जात असून तातडीने कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

Pratap Sarnaik News Dharashiv
BJP internal conflict : बेताल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे, पडळकरांना वॉर्निंग; प्रदेशाध्यक्षांनी तंबी दिल्याने चाप बसणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com