Raju Shetti Vs Ravikant Tupkar : शेट्टींच्या 'स्वाभिमानी'त तुपकर 'साईडलाईन'? सदाभाऊंनीही 'टायमिंग' साधलं

Swabhimani Shetkari Sanghtana News : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर स्वाभिमानीलाही अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
Ravikant Tupkar and Raju Shetti
Ravikant Tupkar and Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाराष्ट्रातील एक आक्रमक चेहरा म्हणून रविकांत तुपकरांकडे पाहिले जाते.मात्र. हेच तुपकर नेतृत्वावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.याचं कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून तुपकर हे स्वाभिमानीशी फारकत घेतल्यासारखे वागत आहे. त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आमचीच कार्यकर्त्यांची असल्याचं विधान केल्यामुळे संघटनेत नव्या वादाची ठिणगी पडली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर स्वाभिमानीतलाही अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी आणि संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांच्यात मतभेद असल्याचं आता ठळकपणे समोर आले आहे.

Ravikant Tupkar and Raju Shetti
Ravikant Tupkar : सोयाबीन-कापसाच्या मुद्द्यावरील तुपकरांच्या आंदोलनानं धरला जोर

महाराष्ट्रात एकीकडे राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊस दरवाढीवरुन रान पेटवलं आहे.या आंदोलनात शेट्टींसह स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मात्र.आपल्या अनोख्या आणि आक्रमक आंदोलनामुळे स्वाभिमानीसह राज्यात चर्चेत राहणारे रविकांत तुपकर मात्र, या आंदोलनात अद्याप तरी कोठेही दिसलेले नाहीत. त्यामुळे शेट्टी आणि तुपकर यांच्यातल्या वादाची पुन्हा एकदा चर्चा जोर धरु लागली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकार आणि कारखानदार यांच्याविरोधात आरपारची लढाई पुकारली आहे.मागील तुटलेल्या उसाला 400 व यंदा प्रतिटन 3500 रुपये दर देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. यावर शेतकरी संघटना व कारखानदार यांच्यातील बैठक तीनवेळा निष्फळ ठरली आहे. या पेटलेल्या आंदोलनाची धुरा एकहाती राजू शेट्टी सांभाळत आहे. पण या आंदोलनात स्वाभिमानीचा प्रमुख आक्रमक नेता म्हणून ओळख असलेले रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांचा सहभाग राहिलेला नाही. यावरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...म्हणून तुपकर बाहेर पडले!

यावेळी रयत क्रांती संघटनेचे नेते आणि राजू शेट्टींचे कट्टर विरोधक सदाभाऊ खोत यांनी देखील स्वाभिमानीतील वादावरुन टायमिंग साधले. ते म्हणाले,स्वाभिमानी संघटनेमध्ये घुसमट होत असल्याने रविकांत तुपकर बाहेर पडले. यावेळी चौकशी समिती शेपूट घालून पळून गेली आहे,असा आरोपही यावेळी करण्यात आला.

बुलढाणा लोकसभा लढणार...

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी साथ सोडल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांना आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तुपकर आणि शेट्टी यांच्यात सध्या खटके उडाले असून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचे पाहायला मिळाले होते.राजू शेट्टीच्या डोक्यात बुलढाणा नाव असो की नसो मात्र, आमच्या डोक्यात बुलढाणा लोकसभेची जागा लढण्याचा निर्णय पक्का आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीने लढणार असा इशारा तुपकर यांनी शेट्टींना दिला आहे. (Swabhimani Shetkari Sanghatna)

Ravikant Tupkar and Raju Shetti
Devendra Fadnavis : अंतरवाली सराटीतील लाठीचार्जचे आदेश फडणवीसांनी दिले ? 'ही' माहिती आली समोर...

माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रातील 5-6 मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.यात हातकणंगले,कोल्हापूर आणि सांगली नावाचा उल्लेख केला.मात्र, या जागांमध्ये बुलढाणा लोकसभेचा उल्लेख त्यांनी केला नाही.यावरुनच तुपकर यांनी शेट्टींना इशारा दिला होता.

तुपकरांचं नेमकं काय चाललंय..?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस दरवाढीवरुन आंदोलन पुकारलं असतानाच दुसरीकडे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूस -उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे.या लढ्याचा पहिला टप्पा म्हणून त्यांनी ‘एल्गार महामोर्चा’काढला आहे.या महामोर्चाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

Ravikant Tupkar and Raju Shetti
Sharad Pawar VS Ajit Pawar: राष्ट्रवादी कुणाची ? सुनावणी वेळी शरद पवारांच्या वकिलांचा आयोगात मोठा दावा

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ५ नोव्हेंबर रोजी सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची सद्बुद्धी दे अशी प्रार्थना करत रथयात्रेचा दणक्यात सुरू केली होती.त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासह शेतकरी, शेतमजूर, तरुणांची मोठी फौज उभी करत रविकांत तुपकर यांनी गाव खेडे पिंजून काढले आहेत.आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी जिल्हाभरातील शेतकरी, शेतमजूर, तरुणांची फौज एकवटली आहे. शेतकऱ्यांचे हे वादळ सोमवारी रोजी बुलढाण्यात धडकणार आहे.

तुपकरांचे शेट्टींवरचे आरोप काय..?

रविकांत तुपकर म्हणाले,माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं उभरतं नेतृत्व पक्ष नेतृत्वाला मान्य नाही.पक्षनेतृत्वाने मला बळ द्यायचं सोडून माझे पंख छाटण्याचं काम केलं, असा गंभीर आरोप त्यांनी राजू शेट्टींवर केला आहे.याचवेळी त्यांनी सातत्याने संघटनेत सावत्र वागणूक दिली जात असल्याचं सांगत आता रविकांत तुपकर यांनी थेट राजू शेट्टींना शिंगावर घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Ravikant Tupkar and Raju Shetti
Rajsathan Election : राजस्थानात बंडोबामुळे भाजपच्या २३ जागा डेंजर झोनमध्ये; सत्तेची समीकरणे जुळवताना होणार कसरत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com