
Dharashiv News : धाराशिव जिल्हा मजूर सहकारी फेडरेशनसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात एकूण आठ मतदान केंद्रावर मतदान झाले. मजूर फेडरेशनसाठी जिल्ह्यात एकून 345 मतदार होते. एकूण 13 पैकी चार जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित नऊ जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत झाली. यामध्ये 9 पैकी 8 जागा जिंकत मजूर फेडरेशनवर महायुतीने सत्ता कायम ठेवली आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या निवडणुकीत घवघवीत यश संपादित करीत वर्चस्व कायम ठेवले आहे.
धाराशिव मजूर फेडरेशनच्या 2025-2029 च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीत दुरंगी लढत झाली. या चुरशीने पार पडलेल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीच्या खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Om RajeNimbalkar) व आमदार कैलास पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.
मजूर फेडरेशनच्या या निवडणुकीसाठी एका मतदाराला विमानाने आणले होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली होती. या निवडणुकीसाठी रविवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये महायुतीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinh Patil) यांनी पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे.
मजूर फेडरेशनवर महायुतीने सत्ता कायम ठेवताना यामध्ये 9 पैकी आठ उमेदवार विजयी झाले आहेत. या पूर्वी महायुतीचे चार सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत 13 पैकी 12 जागा जिंकत महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. महाविकास आघाडीचे लोहारा तालुक्यातील एकमेव उमेदवार पंडितराव ढोणे हे अवघ्या एक मताने विजयी झाले. दुसरीकडे महायुतीचे आठ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.