Ranajagjitsinha Patil : ओमराजेंविरोधात राणाजगजितसिंह पाटलांचा रोल ठरणार महत्त्वाचा; काय आहे धाराशिवचं गणित ?

Dharashiv Lok Sabha Omprakash Rajenimbalkar : धाराशिव लोकसभेतील विधानसभांच्या आमदारांशी संबंध सुधारले, स्थानिक स्वराज्य संस्थांवर मजबूत पकड
Ranajagjitsinha Patil
Ranajagjitsinha PatilSarkarnama

Dharashiv Political News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार शड्डू ठोकून उभा आहे. दुसरीकडे मागील निवडणुकीत एकमेकांच्या समोरासमोर उभे राहणारे दोन पक्ष आता भाजपसोबत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा विजय महायुतीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. त्यात मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आणि सध्या भाजपसाठी प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर असलेली पकड, कार्यकर्त्यांचे संघटन आणि जिल्ह्याच्या मूळ समस्या सोडविण्यासाठी सध्या सुरू असलेली त्यांची सक्रियता या महायुतीच्या आगामी यशासाठी जमेच्या बाजू ठरू शकतात. आमदार पाटील वगळता महायुतीचा विजय अनिश्चित होईल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

Ranajagjitsinha Patil
Maratha Reservation News : आरक्षण कोर्टात टिकण्याची शक्यता कमीच; उल्हास बापटांनी स्पष्टच सांगितलं...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आपले संपूर्ण राजकीय वर्चस्व सिद्ध करणारे डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव तथा माजी मंत्री आणि सध्या तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) हे जिल्हा भाजपचे ताईत आहेत. सत्ताधारी महायुती पक्षातील शिंदे सेनेचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant), आमदार ज्ञानराज चौगुले आणि भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय गुट्टी जमली आहे. काही काळ सावंत यांच्याबरोबर आमदार पाटलांची धुसफूस होती, ती आता संपुष्टात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ranajagjitsinha Patil
Sharmila Thackeray : मनसे लोकसभा लढविण्याच्या तयारीत; शर्मिला ठाकरे मनसैनिकांना देणार बळ...

जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या स्थापनेत या तिघांचीही महत्त्वाची भूमिका आहे. गाव चलो अभियान, मोदींची हमी, या अभियानाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ कार्यकर्त्यांसह सामान्यांना कसा मिळवून देता येईल, याचे यशस्वी प्रयत्न होत आहेत. यातून जनसंपर्क आणि जनसंपर्कातून प्रचार अप्रत्यक्षरित्या सुरू आहे. ग्रामीण भागातील मतदार हा लोकसभेसाठी महत्त्वाचा मानून महायुतीच्या पक्षनेतृत्वाची तयारी सुरू आहे.

Ranajagjitsinha Patil
Maratha Reservation Vishesh Adhiveshan: तीन मुख्यमंत्री, तीनदा मराठा आरक्षण…! आतातरी 'तिघाडा- बिघाडा' सुटणार?

शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून वेगवेगळी शिबिरे घेऊन गरजूंना विविध योजनांचे लाभ मिळवून देणे आणि भविष्यात याच कामाच्या उपकाराची मतरूपी परतफेड मतदारांकडून होण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. भाजपाचे (BJP) आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विधानसभेसह लोकसभा मतदारसंघातही मोठमोठी कामे करण्यास सुरुवात केली.

औसा आणि बार्शी तालुक्यात वाढीस लागलेल्या महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी (NCP) आणि शिंदे सेना वाढीसाठी गाव पातळीवरील कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे, आढावा घेणे अशा उपक्रमातून सामान्यांच्या मनाचा कौल जाणून घेतला जात आहे. यावरून आगामी निवडणूक महायुती सोपी मानली जात आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा केवळ उमेदवार निश्चित मानली जात आहे. उर्वरित राजकीय सक्रियता अजूनही स्थिरावलेली असल्याचे दिसून येते. 

(Edited by Sunil Dhumal)

R

Ranajagjitsinha Patil
Maratha Reservation News : आरक्षण कोर्टात टिकण्याची शक्यता कमीच; उल्हास बापटांनी स्पष्टच सांगितलं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com