Nashik News : तब्बल अठरा वर्षांच्या राजकीय प्रवासात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अपवाद वगळता सत्तेसमीप पोहाेचली आहे. नाशिकमध्ये सत्ता मिळाल्यानंतर पक्षाची अधोगती झाली. मात्र, तरीही पक्षाचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्यासमवेत 'आपली वेळ येईल' या प्रतीक्षेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची तयारी सुरू झाली असून, मनसैनिकांना बळ देण्याची जबाबदारी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी घेतली आहे.
मनसे लवकरच महायुतीत सहभागी होईल, अशा चर्चा सध्या सुरू आहेत. याबाबत काय निर्णय येतो याची मनसैनिकांनाही प्रतीक्षा आहे. मात्र, या निर्णयाकडे लक्ष ठेऊन पक्षाचे कार्यकर्ते सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत. कोणतीही सत्ता नसताना कार्यकर्ते पक्षासोबत असल्याची दखल घेत शर्मिला ठाकरे लवकरच मनसैनिकांसह त्यांच्या कुटुंबीयांबरोबर संवाद साधणार आहेत.
मनसेचा 9 मार्च रोजी वर्धापन दिन असून, तो यंदा नाशिकमध्ये साजरा होणार आहे. यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे हजर राहणार आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्याच्या तयारीचा एक भाग म्हणून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस शर्मिला ठाकरे मनसेच्या पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधणार आहेत. हा कौटुंबिक मेळावा असून, कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांसमवेत त्या हितगूज करतील. पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सुरुवातीपासून एकनिष्ठ आहेत. पक्षाची सत्ता होती आणि आता सत्ता नसतानाही हे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सत्ता नसल्याने पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पक्षवाढीसाठी वेळ देऊन आणि मेहनत घेऊनही यश मिळत नसेल तर कार्यकर्ते निराश होतात. त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होतो. त्यामुळे या मेळाव्याचे विशेष महत्त्व असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांना पक्षासाठी झटताना त्यांच्या कुटुंबाची भूमिका महत्त्वाची असते.
त्यामुळे शार्मिला ठाकरे या कुटुंबीयांशी संवाद साधतील. त्यांच्या अडचणी समजून घेऊन मार्गदर्शन करतील, असे कोंबडे यांनी स्पष्ट केले. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी पक्षाकडून सुरू असून, 9 मार्च रोजीच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी राज ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.