Pandharpur News : शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही, एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्री पदावरून पायउतार होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे भाकीत विरोधक करीत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून महापूजा करणार का? या प्रश्नावर खुद्द फडणवीसांनीच स्पष्टीकरण दिले आहे.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. "राज्यातील जनतेला सुखी ठेवण्याचे आणि सर्व समाजाचे प्रश्न सोडवण्याचे बळ मिळावे," असे साकडे फडणवीसांनी विठुरायाकडे घातले.
या महापूजेवेळी यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे या दाम्पत्याला मान मिळाला.
आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून महापूजेला येणार का? असा प्रश्न फडणवीसांना विचारला असता ते म्हणाले, "आषाढीला मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येईल. विठ्ठलाच्या चरणी आपण नतमस्तक होऊ या!" असे सांगत त्यांनी यावर बोलणं टाळलं.
"राज्यात सध्या विविध समाजाचे प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी आपल्याला वारकरी व्हावे लागेल. राज्यात सध्या मराठा, ओबीसी, धनगर तसेच आदिवासी या समाजाचे आरक्षणाचे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला बळ द्यावे," अशी प्रार्थना फडणवीसांनी विठ्ठ्लाच्या चरणी केली असल्याचेही फडणवीसांनी सांगितले. प्रत्येक समाजाला स्वत:चे प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, ते मांडत असताना दुसऱ्या समाजाविषयी आकस, द्वेष निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचेही मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारीच पंढरपुरात दाखल झाले होते. पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठ्ल रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली.
या वेळी राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेवावे सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती दे, तसेच शेतकरी आणि कष्टकऱ्यांपुढील संकटे दूर करून सुख समृद्धी नांदावी, असे साकडे फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या चरणी घातले आहे. या शासकीय महापूजेनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने फडणवीस दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.