Amit Deshmukh : आरटीओचे अधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करतात! अमित देशमुख यांची थेट परिवहन मंत्र्यांकडे तक्रार

Amit Deshmukh has filed a complaint with the Transport Minister alleging that RTO officers are harassing farmers transporting goods. : लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत आता जीर्ण झाले असून त्याच्या नूतनीकरणासाठी मागणी असलेला 78 लाख रुपयांचा निधी त्वरित मंजूर करावा.
MLA Amit Deshmukh Meet Minister Pratap Sarnaik News
MLA Amit Deshmukh Meet Minister Pratap Sarnaik NewsSarkarnama
Published on
Updated on

Latur News : लातूर ही कृषी मालाची प्रमुख बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या वाहनांची परिवहन विभागाकडून नेहमीच अडवणूक होते ही बाब गंभीर आहे. त्यामुळे शेतीमालाच्या वाहनाचे अडवणूक करू नये, अशा सूचना संबंधित विभागाला देण्यात याव्यात, अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मुंबईत त्यांच्या दालनात भेट घेऊन केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था,अद्यावत बसस्थानक, परिवहन विभागाच्या जीर्ण इमारतीसाठी निधीची मागणीही त्यांनी या भेटीत निवेदनद्वारे केली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश मिळावे आणि मतदारसंघावर असलेली पकड कायम राहावी, यासाठी अमित देशमुख (Amit Deshmukh) कामाला लागेल आहेत. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात मतदारसंघासह लातूर जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर ते बोलताना दिसतात. आज त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची त्यांच्या दालनात भेट घेत लातूरमधील त्यांच्या खात्याशी संबंधित विविध मागण्या मांडल्या

लातूर (Latur) शहरातील मध्यवर्ती ठिकाणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार्किंग व्यवस्थेसह सुसज्ज बसस्थानक उभारण्यात यावे, त्याचबरोबर लातूर येथून महत्त्वाच्या शहरासाठी अद्यावत इलेक्ट्रिक बस सुरू कराव्यात असे अमित देशमुख म्हणाले. याशिवाय परिवहन विभागाच्या संदर्भाने लातूर शहर व जिल्ह्यातील विविध मागण्यांची निवेदने दिले. मराठवाड्यातील प्रमुख शैक्षणिक, औद्योगिक तसेच व्यापारी केंद्र म्हणून नावारूपाला आलेल्या लातूर येथील मध्यवर्ती बस स्थानक बीओटी तत्त्वावर सुसज्ज बनवण्याच्या कामाला यापूर्वीच मंजुरी देण्यात आलेली आहे.

MLA Amit Deshmukh Meet Minister Pratap Sarnaik News
Amit Deshmukh On Marathi : पंचाहत्तर वर्षात गरज भासली नाही मग आताच हिंदीची सक्ती सरकारला का करावी वाटली ?

बहुमजली पार्किंग व्यवस्थेसह हे बस स्थानक लवकर बांधून पूर्ण करावे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एसटी डेपो आंबेजोगाई रोडवर स्थलांतर करून त्या ठिकाणचे बसस्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात यावे, या ठिकाणीही बीओटी तत्त्वावर सुसज्ज बस स्थानक उभारणीला यापूर्वीच मंजुरी मिळालेली आहे ते काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. लातूर शहरासाठी मंजूर असलेल्या इलेक्ट्रिक बस लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात, महत्त्वाच्या शहरासाठी त्याची वाहतूक सुर करावी.

MLA Amit Deshmukh Meet Minister Pratap Sarnaik News
Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक 'मराठी अस्मिता मोर्चात' सहभागी! 'जय गुजरातच्या' डॅमेज कंट्रोलसाठी एकनाथ शिंदेंचे प्रयत्न?

लातूरची जिल्ह्यातील अनेक बस स्थानकाचे बांधकाम अत्यंत धीम्या गतीने चालू आहे ती त्वरित पूर्ण करण्यात यावीत, याकडेही अमित देशमुख यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत आता जीर्ण झाले असून त्याच्या नूतनीकरणासाठी मागणी असलेला 78 लाख रुपयांचा निधी त्वरित मंजूर करावा, असेही सरनाईक यांना देण्यात आलेल्या निवदेनात नमूद करण्यात आले.

MLA Amit Deshmukh Meet Minister Pratap Sarnaik News
Latur Shetkari Viral Video : बैलजोडी परवडेना शेतकऱ्याने स्वत:लाच घेतलं जुंपून, पत्नीने काय केलं पाहा

लातूर ही कृषी मालाची प्रमुख बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या वाहनांची परिवहन विभागाकडून नेहमीच अडवणूक होते ही बाब गंभीर आहे. त्यामुळे शेतीमालाच्या वाहनाचे अडवणूक करू नये अशा सूचना संबंधित विभागाला देण्यात याव्यात, यावरही बैठकीत चर्चा झाली. परिवहन मंत्र्यांनी सकारात्मकता दाखवत या मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com