

Chhatrapati Sambhaji nagar Municipal Corporation: छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौर, उपमहापौरांना वाहन भत्ता देण्याच्या प्रस्तावाला भाजपाच्याच नगरसेवकांनी विरोध दर्शवला. ईलेक्ट्रीक व्हेईकल असताना एवढा अवाढव्य वाहन भत्ता कशासाठी? असा सवाल करत या प्रस्तावाला विरोध झाल्याने स्थायी समितीच्या बैठकीत अखेर हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला.
स्थायी समितीच्या बैठकीत महापौरांना 83 हजार, तर उपमहापौरांना 63 हजारांचा मासिक वाहन भत्ता देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. महापौरांना दरमहा 76 हजार तर उपमहापौर व सभापतींना 55 हजार रुपयांचा वाहन भत्ता देण्याचा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभापतींनी स्थगित ठेवला. एवढ्या भत्त्याची गरज आहे का? असा प्रश्न सदस्यांनी बैठकीत केला.
सभापती अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्थायी समितीची बैठक झाली. त्यात यांत्रिकी विभागातर्फे इंधन दरवाढीचे कारण पुढे करत वाहन प्रतिपूर्ती रकमेचा (भत्ता) प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यामध्ये महापौरांच्या पेट्रोल वाहनासाठी 83 हजार, डिझेल वाहनासाठी 85 हजार आणि EV वाहनांसाठी 76 हजार रुपये दरमहा देण्याचे प्रस्तावित केले होते.
तसेच उपमहापौर, स्थायी समिती सभापती व विरोधी पक्षनेत्यांच्या पेट्रोल-डिझेल वाहनांसाठी अनुक्रमे 62 हजार व 64 हजार रुपये आणि EV वाहनांसाठी दरमहा 55 हजार रुपये भत्ता देण्याची मागणी केली होती. या प्रस्तावात चालकाचा पगार आणि गाड्यांच्या देखभाल-दुरुस्ती खर्चाचाही समावेश करण्यात आला होता. याविषयी यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी खुलासा करताना सांगितले की, प्रशासनाने अभ्यास करून हा प्रस्ताव सादर केला आहे. पण त्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही.
प्रस्ताव चर्चेला येताच भाजपाचे नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी आक्षेप घेतला. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग आणि देखभालीसाठी दरमहा एवढा अवाढव्य खर्च कसा काय येतो? EV वाहनांना एवढी मोठी प्रतिपूर्ती देण्याची मुळीच आवश्यकता नाही, असे त्यांचे म्हणणे होते. नगरसेवकांचा विरोध आणि प्रस्तावातील त्रुटी लक्षात घेता सभापती अनिल मकरिये यांनी हा ऐनवेळचा प्रस्ताव स्थगित ठेवत योग्य त्या सुधारणा करून पुढील सभेत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश यांत्रिकी विभागाला दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.