Sambhaji Patil Nilangekar : इसे कहते है 'कॉन्फिडन्स'...! निकालाआधीच निलंगेकरांच्या विजयाचं बॅनर झळकलं

Nilanga Assembly Election Constituency : विजय कोणाचा होईल हे सध्या निश्चित सांगण्यात येत नसले तरीही कार्यकर्त्याकडून विजय पराजयाचे गणित मांडले जात आहे.
Sambhaji Patil Nilangekar 2.jpg
Sambhaji Patil Nilangekar 2.jpgSarkarnama
Published on
Updated on

Nilanga News : निलंगा मतदारसंघातील देवणी येथे निकालाआधीच माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विजयाचे बॅनर झळकत आहेत. कार्यकर्त्यांनी हे बॅनर विजयी भव म्हणून लावले आहे. या बॅनरची सर्वत्र मोठ्या उत्साहाने चर्चा सुरू आहे.

निलंगा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) तर महाविकास आघाडीकडून अभय साळुंके अशी दुरंगी लढत झाली.

प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये आणि घडामोडी झाल्या असल्या तरी प्रत्येकाकडून जातीय समीकरण स्थानिक प्रश्न विकासासाठी आणलेला निधी अशा विविध मुद्द्यांवर ही निवडणूक गाजली असली तरी निलंगा विधानसभा मतदारसंघ हा अतिशय चुरशीचा व प्रतिष्ठेचा मानला जात आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे विशेष लक्ष लागले आहे.

Sambhaji Patil Nilangekar 2.jpg
Saam Exit Poll 2024 : खडकवासल्यात दोडकेंनी फटाके फोडले; मात्र विजयाची माळ तापकिरांच्या गळ्यात पडण्याची शक्यता

ज्या निलंग्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर व देशभर पसरवणारे माजी मुख्यमंत्री कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. शिवाय लातूर जिल्ह्यावर निलंगेकर, देशमुख व चाकूरकर या तीन घराण्याचेच वर्चस्व गेल्या अनेककाळापासून राहिले आहे.

'हायकमांड' विश्वासातले आणि काँग्रेसचे एकेकाळचे दिग्गज नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनाही मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. त्यामुळे लातूर शहर मतदारसंघातील उमेदवार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांची जागा व निलंग्यातील माजी मंत्री संभाजी पाटील यांची जागा या दोन्ही दिग्गज नेत्याच्या विजयाकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

Sambhaji Patil Nilangekar 2.jpg
Saam Exit Poll 2024 : लोकप्रियता अनुराधा नागवडेंची, परंतु कौल पाचपुतेंच्या बाजूने; 'विक्रम' होणार? ...पाहा VIDEO

त्यातच निलंगा मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांनी जवळपास तीन हजार 500 कोटीची मतदारसंघात विकास कामे केली आहेत, बुथरचना ग्रामीण भागापर्यंत कार्यकर्त्याची मजबूत फळी, त्याचबरोबर जातीय समीकरण ही त्यांच्या जमेची बाजू राहणार आहे. तर निलंगेकर घराण्याला वगळून काँग्रेसने यावेळी पहिल्यांदा तिकीट दिल्यामुळे निष्ठावंत निलंगेकर यांनी काँग्रेस उमेदवाराची कितपत काम केले हे महत्त्वाचे राहणार आहे.

विजय कोणाचा होईल हे सध्या निश्चित सांगण्यात येत नसले तरीही कार्यकर्त्याकडून विजय पराजयाचे गणित मांडले जात आहे. देवणी शहरांमध्ये काही कार्यकर्त्यांनी थेट संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विजयाचे बॅनर लावले आहे. निकालाला काही तास बाकी असतानाच या विजय बॅनरचे सर्वत्र जोरदार चर्चा मात्र सुरू आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com