Aimim-BJP News : महापालिकेच्या स्टॅडिंग कमिटी बैठकीत एमआयएम-भाजपच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी; सभापतींनी दम दिल्यानंतर वाद निवळला!

BJP-MIM clash News : स्थायी समितीच्या बैठकीत एमआयएमचे नगरसेवक अझहर पठाण, भाजपचे राजगौरव वानखेडे, सुरेंद्र कुलकर्णी, सभापती अनिल मकरिये यांच्यात बराच वेळ खडाजंगी सुरू होती.
Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महापालिकेची सर्वसाधारण सभा असो की स्थायी समितीची बैठक सत्ताधारी भाजपा आणि एमआयएमच्या नगरसेवकांमधील तानातानी हा नित्याचाच विषय झाला आहे. वाद उकरून काढायचा आणि त्यावरून मग भांडायचे, महत्त्वाच्या प्रश्नांना बगल द्यायची असे प्रकार सातत्याने सुरू असतात.

आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत एमआयएमचे नगरसेवक अझहर पठाण, भाजपचे राजगौरव वानखेडे, सुरेंद्र कुलकर्णी, सभापती अनिल मकरिये यांच्यात बराच वेळ खडाजंगी सुरू होती. अझहर पठाण ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर सभापतींनी मी तुम्हाला बाहेर काढीन, असा दम भरला आणि एमआयएम नगरसेवकांचा पंतग जमीनीवर आला.

शहरात महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या अनधिकृत प्लॉटिंग, त्यातून होणारे व्हाइट आणि ब्लॅक मनीचे व्यवहार आदींबाबत माहिती सांगणाऱ्या एमआयएम नगरसेवकाला सभापतींनी वैयक्तिक विषय इथे आणू नका, लोकांच्या विषयावर, विकासावर बोला, असे सांगत खाली बसण्यास सांगितले, मात्र त्यांनी मी बसणार नाही, बोलणार, असा पवित्रा घेतल्याने, अशी दादागिरी चालणार नाही, असे म्हणत भाजप नगरसेवकांनीही दंड थोपटले.

Chhatrapati Sambhajinagar News
Maharashtra Political Live Update : मोठी बातमी: मुंबई पोलिसांनी मुंबईतील ओबीसी समाजाच्या आंदोलनाला परवानगी नाकारली

त्यामुळे शुक्रवारी (ता. ४) स्थायी समितीच्या बैठकीतील वातावरण काही मिनिटांसाठी चांगलेच तापले होते. अखेर ऐकत नसाल तर बाहेर काढण्यात येईल, असा इशारा सभापतींनी दिल्यानंतर एमआयएम नगरसेवक खुर्चीवर शांतपणे बसले. एमआयएम नगरसेवक अजहर पठाण यांनी अनधिकृत प्लॉटिंग व्यावसायिकांवर होत असलेल्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला.

Chhatrapati Sambhajinagar News
Rana Patil Politic's : ठाकरेंच्या नगरसेवकांनी शिवसेनेऐवजी भाजपमध्ये प्रवेश का केला; राणा पाटलांनी सांगितले महत्वाचे कारण...

या विषयावर त्यांनी ते माहिती सांगत असताना, अवैध प्लॉटिंगचे फायदे-तोटे, त्यात होणारे व्यवहार, मनपाचे नुकसान, अशा अनेक मुद्द्यावर ते बोलू लागले. त्याचवेळी सभापतींनी त्यांना रोखले, व वायफळ चर्चा करू नका, मुद्यावर बोला, मोजक्या शब्दांत विषय मांडा, अशी सूचना त्यांना केली. मात्र त्यांनी लांबलचक भाषण सुरूच ठेवले. सुरेंद्र कुलकर्णी यांनीही त्यांना ब्लॅक मनी, व्हाइट मनी, सरकारी दर काय, याचा येथे काय संबंध, सभागृहात लोकांच्या विषयावर बोला, असे सांगितले.

Chhatrapati Sambhajinagar News
KDMC Politics : "आमचा आवाज दाबाल तर...", केडीएमसी महासभेत नगरसेवकांचा प्रचंड गोंधळ; शिवसेना-भाजप आमनेसामने

यावेळी भाजप नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनीही एमआयएमचे नाव घेत जोरदार प्रतिउत्तर दिले. पक्षाचे नाव घ्यायचे नाही, असे म्हणत पठाण यांनी आक्षेप घेतला. त्यावरून दोघांमध्ये शाब्दीक वाद वाढला. सभापतींनी त्यांना विषय संपवा, अशी सूचना केली. त्यानंतरही मी बोलणार, असे म्हणत पठाण यांनी विषय मांडणे सुरूच ठेवले.

त्यावर तुम्ही प्लॉटिंगवाले, तेही प्लॉटिंगवाले, मला सगळं माहित आहे. तुमचे वैयक्तिक विषय इथे आणायचे नाही., असे सांगूनही पठाण ऐकत नसल्याचे पाहून, खाली बसा, असे सांगूनही ऐकत नसाल तर सभागृहाबाहेर काढण्यात येईल, असा इशारा सभापती मकरिये यांनी त्यांना दिला. दरम्यान यावेळी सभागृहात एमआयएमचे इतर तीन नगरसेवकही उपस्थित होते, मात्र त्यांनी या विषयात बोलण्याचे टाळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com