

Shivsena UBT News : छत्रपती संभाजीनगर शहरासाठीच्या पाणी योजनेला 2019 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिली. पण ही योजना पुढे सुरू करण्याचे काम, त्याचे भूमिपूजन आणि काम करणारी एजन्सी ठरवण्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करण्यात काहीच अडचण नव्हती. पण भाजप आणि त्यांच्या महापौरांनी आपल्या मनाचा कोतेपणा हा प्रस्ताव नाकारून केला.
पाणी योजनेचे श्रेय सध्या जे भाजपचे (BJP) नेते घेत आहेत, ते केवळ बाहुले आहेत, या पाणी योजनेसाठी त्यांचे कुठलेही योगदान नाही. अतुल सावे यांचे तर नाहीच नाही, त्यांना चावी दिली की ते बोलतात, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला. मुळात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अभिनंदनाच्या ठरावाची गरजच नव्हती. त्यापेक्षा जनतेच्या प्रश्नावर अधिक भर दिला असता, तर बरे झाले असते.
निश्चितच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या पाणी योजनेला गती दिली, त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावाला शिवसेनेचा कुठलाही विरोध असण्याचे कारण नाही. नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचीही या योजनेत महत्त्वाची भूमिका होती, मग त्यांचेही अभिनंदन भाजपच्या नगरसवेकांनी आणि महापौरांनी करायला हवे होते. पण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावाला विरोध करत महापौर आणि भाजपच्या नगरसेवकांनी आपल्या कोतेपणाचे दर्शन घडवले, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
पाणी पुरवठा योजनेला कंत्राटदार मिळत नव्हता, तेव्हा उद्धव ठाकरे यांनीच एका एजन्सीला घोड्यावर बसवून कामाला सुरुवात केली. वेळोवेळी निधी दिला, मग त्यांच्या नावाची भाजपाला अॅलर्जी का? भाजपचे नगरसेवक आणि महापौर भविष्यातही असेच वागणार असतील तर आमचे सहा नगरसेवक तुमच्या साठ नगरसेवकांना पुरून उरतील, असा इशाराही अंबादास दानवे यांनी दिला.
संभाजीनगर आम्ही केले..
हेच शहराच्या नामकरणाच्या बाबतीत झाले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीच मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर अशी सुधारणा केली. त्यामुळे शहराच्या नामकरणाचे श्रेय देखील आमचेच आहे, भाजपने ते लाटू नये, असेही अंबादास दानवे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.