Jalna Loksabha News : संदिपान भुमरे थेट महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळेंच्या घरी..?

Political News : लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगरचे महायुतीचे उमेदवार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे महाविकास आघाडीच्या कल्याण काळे यांच्या संभाजीनगरातील पुण्याई बंगल्यावर भेटायला गेले.
Sandippan Bhumre, Kalyan kale
Sandippan Bhumre, Kalyan kale Sarkarnama

Chhatrpati Sambhajinagar News : संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी थेट लढत 48 लोकसभा मतदारसंघात पहायला मिळाली. दोन्ही बाजूच्या केंद्र आणि राज्यातील नेत्यांनी प्रचार सभांमधून एकमेकांवर जोरदार हल्ले चढवले. अनेक मतदारसंघात स्थानिक पातळीवर वेगळेच राजकारण घडल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे. यापैकीच एक म्हणजे लोकसभेचा जालना मतदारसंघ.

पाचवेळा खासदार राहिलेले महायुतीचे रावसाहेब दानवेविरुद्ध (Raosaheb Danve) महाविकास आघाडीचे माजी आमदार कल्याण काळे (Kalyan Kale) यांच्यात येथे काँटे की टक्कर झाली. एकतर्फी वाटणारी ही लढत काळे यांच्या बाजूने झुकल्याचे मतदानानंतर बोलले जाऊ लागले. या उत्साहाच्या भरातच काळे यांनी मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून संपूर्ण मतदारसंघात आभार दौरा सुरू केला होता.

Sandippan Bhumre, Kalyan kale
Pankaja Munde News: बीडमधील निवडणुकीनं वेगळा रंग कसा घेतला? सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पंकजा मुंडेंनी सांगितलं...

गावागावत जाऊन त्यांनी काँग्रेस व आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन निवडणुकीत त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल आभार व्यक्त केले. पण सगळ्यांना आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगरचे महायुतीचे उमेदवार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे महाविकास आघाडीच्या कल्याण काळे यांच्या संभाजीनगरातील पुण्याई बंगल्यावर भेटायला गेले याचा.

संदीपान भुमरे आज अचानक काळे यांच्या पुण्याई निवासस्थानी जाऊन धडकले. यावेळी मोजके पदाधिकारी त्यांच्यासोबत होते. दोघांमध्ये बराच वेळ राजकीय चर्चा झाली. भुमरे हे संभाजीनगरमधून लोकसभा लढवत असले तरी त्यांचा पैठण विधानसभा मतदारसंघ हा जालना लोकसभेत येतो.

महायुतीचे उमेदवार म्हणून तिथे भुमरेंची मदत रावसाहेब दानवे यांना झाली असे गृहित धरले जात आहे. मात्र, महाविकास आघाडीचे जालन्याचे उमेदवार कल्याण काळे यांची भुमरेंनी घरी जाऊन घेतलेली भेट याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. पैठणमधून भुमरे यांची महाविकास आघाडीच्या काळेंना छुपी मदत तर झाली नाही ना? अशी चर्चा या भेटीनंतर होताना दिसते आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रावसाहेब दानवे यांना मंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री अर्जून खोतकर यांची मदत झाली नाही, असे बोलले जाते. त्यात आता पैठणमधून भुमरेंची मदत काळेंनाच झाली की काय? अशी शंका काळे-भुमरे भेटीमुळे उपस्थितीत केली जात आहे. काळे यांनी स्वतःच या भेटीची माहिती आपल्या सोशल मीडिया पेजवरून दिली.

महाराष्ट्र राज्याचे रोहोयो मंत्री तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर संदिपान भुमरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील पुण्याई निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी किरण पाटील डोणगावकर, भगवान वाघ, सचिन खलसे आदि उपस्थित होते.

कल्याण काळे यांच्या जालना मतदारसंघातील आभार दौऱ्याची चर्चा होत असताना आजच्या भेटीत नेमके कोणी कोणाचे? आणि कशासाठी आभार मानले? असतील यावर राजकीय वर्तुळात खल सुरू झाला आहे.

(Edited by : Sachin Waghmare)

Sandippan Bhumre, Kalyan kale
Sandipan Bhumre News : '...त्यामुळे मी खासदार होणारच' ; संदीपान भुमेरेंचा विश्वास!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com